जय महेश कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:03 PM2020-02-25T23:03:19+5:302020-02-25T23:05:23+5:30

शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिला आहे.

Jai Mahesh ordered to file a case against the director of the factory | जय महेश कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जय महेश कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देखंडपीठ : जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार कारवाई करा

बीड : शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील तालखेड येथील शेतकरी पवन रामकिसन चांडक यांनी याचिका दाखल केली होती की, जय महेश शुगर लिमिटेड, पवारवाडी यांनी फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये त्यांचा ऊस गाळपासाठी नेला. ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार साखर कारखान्याने शेतकºयाचा ऊस गाळपासाठी नेल्यानंतर १४ दिवसांत त्याचा मोबदला दिला पाहिजे. १४ दिवसांत मोबदला देऊ न शकल्यास किंवा मोबदला देण्यास विलंब झाल्यास, शेतकºयाला देय मोबदल्यावर दरसाल दर शेकडा १५ टक्के दराने व्याज मिळायला हवे.
जय महेश कारखान्याने याचिकाकर्ता आणि इतर शेतकऱ्यांना उसाचा मोबदला मुदतीत दिला नाही. कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून शेतकºयांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. सुनावणीअंती खंडपीठाने माजलगाव (ग्रामीण) पोलिसांना वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी, तर शासनातर्फे एस. बी. नरवडे यांनी काम पाहिले.

Web Title: Jai Mahesh ordered to file a case against the director of the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.