अतिवृष्टीचा तडाखा ! मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 09:47 AM2021-09-24T09:47:55+5:302021-09-24T09:53:57+5:30

Rain In Beed शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Heavy rains hit! Six gates of Manjara Dam opened, causing severe damage to agriculture | अतिवृष्टीचा तडाखा ! मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतीचे अतोनात नुकसान

अतिवृष्टीचा तडाखा ! मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतीचे अतोनात नुकसान

Next
ठळक मुद्देनद्यांचे पाणी मोठया प्रमाणात शेतात घुसलेपाण्याचा प्रवाह वाढल्याने गेट वरूनही वाहू लागले पाणी

अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने  मांजरा धरणात पाण्याची आवक अतिप्रचंड वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच  मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. 

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी (दि.२२) सकाळी सहा दारवाजे  सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. रात्री पाणीपातळी कमी झाल्याने चार दरवाजे बंद करून फक्त दोन दरवाजे चालू ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री ८ वाजता हे दोन दरवाजे देखील बंद करण्याचे नियोजन होते. मात्र, गुरुवारी दुपारपासूनच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी तर पावसाने रौद्ररूप धारण केले. अतिवृष्टीमुळे धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे रात्री सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. परंतु, पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ होत  असल्याने अखेर आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीला पुर येऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरवाज्याच्या वरुन पाणी वाहत असल्याने लवकरच सर्व दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. 

शेतीचे अतोनात नुकसानद

रम्यान, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतीचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. तर, धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असताना सध्या धरणात २२६.५ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेकडो एकर शेतात घुसून शेते पाण्याखाली बुडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बंधाऱ्याचे दरवाजे तुटले, पूल पाण्याखाली

दरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रचंड वेगाने अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपुर - कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्याही माहिती सूत्रांनी दिली. तर, आवाड शिरपुरा सहित इतर अनेक लहान पूल पाण्याखाली गेले आहेत. 

सतर्कता बाळगण्याच्या आ. नमिता मुंदडांच्या सूचना

धरणातून पाणी नदीपात्रात नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी पहाटेच केज आणि अंबाजोगाईच्या तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांनाही पूर्णवेळ हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. तसेच, राज्य शासनाने आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही आ. मुंदडा यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांना प्रतीहेक्टरी ५० हजारांची मदत द्या

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील  शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी किसान कॉँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अ ॅड. माधव जाधव यांनी केली आहे.

Web Title: Heavy rains hit! Six gates of Manjara Dam opened, causing severe damage to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.