मुलीच्या लग्नासाठी पाचजण रेडझोनमध्ये गेले; परत येताच क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:16 PM2020-05-22T18:16:52+5:302020-05-22T18:17:49+5:30

विना परवाना पर जिल्ह्यात जात मुलीचे लग्न लावून गावात घुसखोरी

Five went to the redzone for the girl's wedding; Refusal to be quarantined upon return | मुलीच्या लग्नासाठी पाचजण रेडझोनमध्ये गेले; परत येताच क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल

मुलीच्या लग्नासाठी पाचजण रेडझोनमध्ये गेले; परत येताच क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देलोणगाव येथील पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल

माजलगाव : तालुक्यातील लोणगाव येथील मुलीचा विवाह अहमदनगर येथे लावून देवून परत गावात येत मुक्त फिरणाऱ्या मुलीच्या वडीलासह पाच जणांनी शेतात क्वारंटाईन होण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्याविरुध्द दिंद्रुड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणगाव येथील शेषेराव हरीभाऊ  निंबाळकर, युवराज शेषेराव निंबाळकर, शिवराज शेषेराव निंबाळकर, मीरा शिवराज निंबाळकर यांनी युवराज निंबाळकर याच्या मुलीचा विवाह चार दिवसांपूर्वी अहमदनगर येथे विना परवानगी जात लावला. त्यानंतर ते परत लोणगाव येथे आले. येथे आल्यानंतर साथीचा रोग पसरेल हे माहीत असतांना गावात विना मास्कचे फिरत असतांना गावातील ग्रामसेवक सुहास भुजंग गायकवाड यांनी त्यांना शासकीय पास आहे काय हे विचारले, त्यांच्याकडे पास नसल्याने त्या पाच जणांना शेतात क्वारंटाईन होण्यास सांगितले असता. यास त्यांनी नकार दिल्याने ग्रामसेवक सुहास गायकवाड यांनी पाच जणांविरुद्ध दिंद्रुड पोलीसात तक्रार दिल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Five went to the redzone for the girl's wedding; Refusal to be quarantined upon return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.