शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:53 PM2020-02-28T23:53:46+5:302020-02-28T23:54:24+5:30

माजलगाव : शहरातील जिनिंगवरील शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच ...

Farmers' Basics | शेतकऱ्यांचा ठिय्या

शेतकऱ्यांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देग्रेडरला आवर : खरेदी केंद्रानंतर तणाव निवळला

माजलगाव : शहरातील जिनिंगवरील शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे शुक्रवारी टीएमसी केंद्रावर शेतक-यांनी चार तास ठिय्या आंदोलन केले. अखेर भाजप नेते रमेश आडसकर यांच्या पुढाकाराने यार्डमध्ये उभी असलेली कापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली. तसेच आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला.
आपला कापूस खरेदी केंद्रावर घालण्यासाठी शेतकरी दररोज खेटे मारत आहेत. तालुक्यात अंबादास व मनकॉट जिनिंग या दोन ठिकाणीच शासकीय खरेदी सुरू आहे. या तुलनेत शेतकºयांनी कापूस घालून आणलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागत आहेत. त्यात ग्रेडर अनंत मोरेच्या मनमानीमुळे शेतकरी व ग्रेडरमध्ये खटके उडत आहेत.
चार-चार दिवसांपासून वाहनांचे भाडे भरत दिवसरात्र केंद्रावर मापासाठी तिष्ठत राहावे लागत होते. शुक्रवारी दुपारी संयम सुटल्याने शेतक-यांनी टीएमसी केंद्रावर ठिय्या आंदोलन केले. तेथे आडसकर यांनी शेतक-यांचे प्रश्न समजुन घेतले. त्यानंतर संबंधित अधिकारी व ग्रेडर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून इतर दोन खरेदी केंद्र सुरू करावयास भाग पाडले. तत्काळ पूर्वा जिनिंगवरील शासकीय केंद्र सुरु केले.
दरम्यान सोमवारी आणखी एक खेंद्र सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतक-यांनी त्यांची वाहने हलवली. कापसाची जवळपास चारशे वाहने तीन खरेदी केंद्रांवर विभागून दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला. यावेळी रामेश्वर टवानी,रामू चांडक,ईश्वर खुरपे,मनोज फरके उपस्थित होते.

Web Title: Farmers' Basics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.