उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहण; अशी घ्या काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:38 PM2019-12-25T17:38:39+5:302019-12-25T17:43:26+5:30

ग्रहणाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे ते पाहण्यासाठी अनेकजण चुकीच्या पद्धतींचा वापर करतात.

Do not look at the solar eclipse with open eyes; Take care ... | उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहण; अशी घ्या काळजी...

उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहण; अशी घ्या काळजी...

googlenewsNext

माजलगाव :  खगोलशास्त्र, विद्यार्थी- शिक्षकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील सुर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.

ग्रहणाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे ते पाहण्यासाठी अनेकजण चुकीच्या पद्धतींचा वापर करतात. यामुळे डोळ्यांना इजा व्होऊ शकते. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांना अपाय होणार नाही यासाठी खालील प्रकारे काळजी घ्यावी : 

हे परिणाम व्होऊ शकतात :  

सूर्यग्रहणाच्या वेळेत उत्सर्जित होणार्‍या  Ultravoiolet radiation (7290mm)  व इन्फ्रारेड (Infrared radiation) सारख्या किरणांमुळे डोळ्याला अकाली वृध्दत्व येण्याचा धोका असतो.
- तीव्र प्रकाशामुळे डोळ्याची बाहुली (Pupil) आकुंचन पावते व हानीकारक uvrays डोळ्यात जात नाहीत. सूर्यासमोर चंद्र आल्यामुळे प्रकाशाची प्रखरता कमी होते. बाहुली अकुंचन पावत नाही व डोळ्यांमध्ये हानीकारक किरण जाऊन हानी होऊ शकते. 
उदा. कमी वयात मोतिबिंदु होणे व तात्पुरते अंधत्व येणे. 

- डोळ्यांनी स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी डोळ्याच्या मागील बाजुस पडदा, आतपटल (Retina) च्या मधोमध (Macula) नावाचा भाग असतो. Infared किंवा Ultraviolet किरणांच्या संपर्कामुळे (Retina) Rodas and Corens च्या पेशी जळतात व कायमचे अंधत्व येऊ शकते. अशा किरणामुळे होणार्‍या इजेच्या वेदना होत नाहीत व त्यांचा प्रभाव प्रत्यक्ष संपर्कानंतर काही तासांनी दिसतो.

- मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेल्या व नैसर्गिक लेन्स काढुन त्याजागी हलक्या प्रतीच्या Uv protection नसलेल्या लेन्स टाकलेल्या रूग्णांना Macular Burn होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. Macular Burns मुळे होणार्‍या अंधत्वावर वैदक शास्त्रात अद्याप उपाय नाही. 

हे करू नका : उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहु नका.
 

यामधून सूर्यग्रहण पाहणे धोक्याचे : 
- काळा चष्मा, X-ray, cds फोटोची निगेटिव्ह ई. Telescope, दुर्बीण, कॅमेरा वापरू नका.
असे पहा सूर्यग्रहण : 
- ISO नामाकिंत प्रमाणीत चष्म्यातुनच सुर्यग्रहण पहा.
- सुर्यग्रहण पाहण्यासाठी 14 NO वेल्डींगचा काच वापरा.
- एकाच डोळ्याचा वापर करा.
- सुर्यग्रहण पाहतांना जवळ अनुभवी व्यक्ती हवी

ग्रहणातील तीव्र किरणांनी डोळ्यांना इजा होऊ शकते
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, ते बघण्यापुर्वी त्याचे प्रतिबिंब पाहावे. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा  ग्रहण काळातील तीव्र किरणांनी डोळ्याला अकाली वृध्दत्व येण्याचा धोका असतो. - डॉ. स्वानंद कुलकर्णी, नेत्रतज्ञ

Web Title: Do not look at the solar eclipse with open eyes; Take care ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.