बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:19 PM2020-03-13T23:19:33+5:302020-03-13T23:20:06+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळून आल्याने उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी हा कायदा लागू केला आहे.

Disaster Management Act applies in Beed district | बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळून आल्याने उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी हा कायदा लागू केला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर व देशांतर्गत कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळत असल्याने हे प्रवासी देशाच्या विविध भागात प्रवास करीत आहेत. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या कायद्याद्वारे आखण्यात आल्या आहेत. याबाबत पूर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व सनियंत्रक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार घोषित करण्यात आले.
या आदेशान्वये पोलीस विभाग, नगरपालिका, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आदी विभागांना सतर्क करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करणे, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा व गैरसमज यांना अटकाव प्रतिबंध करणे, जिल्हा प्रशासन जिल्हा रुग्णालया मार्फत व तालुकास्तरावरील रुग्णलया मार्फत उपचार व आरोग्य विषयक सुविधा पुरवणे, औषधे, मास्क याच्या अनुषंगिक बाबींवर नियंत्रण राखणे याच बरोबर जिल्हास्तरावर कोरोना विषाणू संसर्ग आजाराच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करणे या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
संपर्क साधण्याचे आवाहन मात्र, संपर्क होण्याची खात्री नाही
नागरिकांनी कोरोना संबंधित काही माहिती किंवा संशयित रुग्ण आढळल्यास प्रशासनाने अपत्ती व्यवस्थापनाचा दूरध्वनी क्रमांक ०२४४२-२२२६०४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मात्र, या दुरध्वनी क्रमांकावर फोन लागत नाही किंवा लागला तर तो उचलला जात नाही. त्यामुळे संपर्क होईल याची खात्री नागरिकांनी बाळगू नये. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Disaster Management Act applies in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.