The death of two due to electric shock in Beed | आकडा टाकताना विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू
आकडा टाकताना विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू

ठळक मुद्दे वाऱ्यामुळे विजेच्या तारेवर टाकलेले आकड्यांचे वायर निघाले पावसामुळे हा बांबू ओला असल्याने त्यात विद्युत प्रवाह उतरला

माजलगाव (जि. बीड) : घरासमोरील वीज वाहक तारेवर ओल्या बांबूने आकडा टाकत असतांना बांबूमध्ये वीजप्रवाह उतरल्याने मीराबाई शंकर जाधव (३२) व दत्ता राठोड (२३) या दोघांना शॉक बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वा. वाजता घडली.

तालुक्यातील मोगरा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे विजेच्या तारेवर टाकलेले आकड्यांचे वायर निघाले होते. त्यामुळे रविवारी सकाळी ताडोबा तांड्यावरील मीराबाई जाधव यांनी  त्यांचा भाचा दत्ता राठोड यास तारेवरील निघालेले आकड्याचे वायर टाकण्यास सांगितले. हे ऐकून दत्ता याने आकडा टाकण्यासाठी बांबू हातात घेतला. मात्र, पावसामुळे हा बांबू ओला झालेला असल्याने दत्ताने विद्यूत तारेला बांबूचा स्पर्श केल्याबरोबर त्यात विजप्रवाह उतरला. त्यामुळे दत्ता राठोड जागेवरच थरथरत असल्याचे दिसताच मीराबाई त्यास वाचवण्यासाठी धावल्या. त्यांनी दत्ताला वाचविण्यासाठी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार शॉक लागला. या घटनेत दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.  दत्ता हा अविवाहित, तर मीराबाईस दोन मुले आहेत. याप्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


Web Title: The death of two due to electric shock in Beed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.