महानिरीक्षक संजय लाठकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक घोषित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 04:41 PM2019-07-29T16:41:21+5:302019-07-29T17:34:37+5:30

सध्या रांची येथे सीआरपीएफमध्ये महानिरीक्षक म्हणून  प्रतिनियुक्त आहेत.

CRPF Inspector General Sanjay Anand Latkar Honoured With Best Service Medal | महानिरीक्षक संजय लाठकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक घोषित 

महानिरीक्षक संजय लाठकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक घोषित 

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ६० प्रशस्तिपत्रे त्यांनी प्राप्त केली आहेत. २४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि सीआरपीएफमध्ये कार्य

बीड : सीआरपीएफच्या ८१ व्या वर्धापनदिनी पोलीस महानिरीक्षक संजय आनंदराव लाठकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे  उत्कृष्ट सेवापदक घोषित करण्यात आले.लाठकर हे भारतीय पोलीस सेवेतील १९९५ मधील झारखंड कॅडरमधील अधिकारी असून, ते सध्या रांची येथे सीआरपीएफमध्ये महानिरीक्षक म्हणून  प्रतिनियुक्त आहेत. सीआरपीएफच्या ८१ व्या वर्धापनदिनी आयोजित त्यांच्या राष्ट्राप्रती केलेल्या कार्याची दखल घेऊन शनिवारी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

आपल्या २४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि सीआरपीएफमध्ये उत्कृष्टपणे सेवा बजावली आहे. यापूर्वी त्यांना पोलीस वीरतापदक, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे वीरतापदक, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाद्वारे दिले जाणारा महात्मा गांधी शांती पुरस्कार, आंतरिक सुरक्षा पदक व उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी आतापर्यंत विविध सेवा बजावताना प्रशंसा पदके ७ वेळा प्राप्त केली आहेत. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, मध्यप्रदेशमध्ये त्यानी प्रशंसनीय कामगिरी बजावली.   आतापर्यंत ६० प्रशस्तिपत्रे त्यांनी प्राप्त केली आहेत. या स्पृहणीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. संजय लाठकर हे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी भारतीय पोलिस सेवेत त्यांनी लातूर व परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. अतिरिक्त पोलिस आयुक्त पुणे शहर व दहशतवाद विरोधी पथक येथे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

Web Title: CRPF Inspector General Sanjay Anand Latkar Honoured With Best Service Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.