coronavirus : शहरवासीयांनी नाही पण ग्रामस्थांनी गांभीर्याने घेतले; संकट टाळण्यासाठी आवरगावकरांनी गाव सीमाबंद केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:52 PM2020-03-24T13:52:45+5:302020-03-24T13:53:38+5:30

गावाच्या सर्व सीमाबंद करून तरुण देत आहेत पहारा

coronavirus: not the townspeople but the villagers took it seriously; In order to prevent the crisis, the villagers closed the village | coronavirus : शहरवासीयांनी नाही पण ग्रामस्थांनी गांभीर्याने घेतले; संकट टाळण्यासाठी आवरगावकरांनी गाव सीमाबंद केले

coronavirus : शहरवासीयांनी नाही पण ग्रामस्थांनी गांभीर्याने घेतले; संकट टाळण्यासाठी आवरगावकरांनी गाव सीमाबंद केले

Next

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथील ग्रामपंचायतीने गावा ब हेरील लोकांना प्रवेशबंदी करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसपासून गावाचा बचाव करण्यासाठी हा निर्णय  ग्रामस्थांनी एकमताने घेतला असून गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

धारूर शहरापासून तीन किलोमीटर असलेले आवरगाव आता ग्रामस्थांनी संपूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. जवळपास 1500 लोकसंख्येच्या गावात मोठी व्यापारी पेठ आहे. कोरोना सारख्या रोगाशी लढण्यासाठी  सरपंच अमोल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी भविष्यामध्ये रोगाची लागण आपल्या गावांमध्ये होऊ नये म्हणून गाव अक्षरशः लॉकडाऊन केले आहे. या सोबतच गावातील तरुण सीमेवरील रस्त्यावर पहारा देणार आहेत. आज लोकांना सूचना देऊन जे अत्यावश्यक सामुग्री किराणामाल आणण्यासाठी सांगितले व तसेच गावातील मंदिराला ही कुलुप लावले आहे. या धाडसी निर्णयाचे गावातील रहिवाशांनी स्वागत केले आहे. याच्या अंमलबजावणी साठी सरपंच अमोल जगताप,रवि जगताप , कुलदीप जगताप, राहुल नखाते , दिगंबर नखाते, अविनाश जगताप, गणेश जगताप यांच्यासह ग्रामस्थ 

Web Title: coronavirus: not the townspeople but the villagers took it seriously; In order to prevent the crisis, the villagers closed the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.