CoronaVirus : काळजीपोटी आई म्हणतेय निघून ये; पण मी सांगते, मला सेवा करायचीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 03:05 PM2020-05-05T15:05:12+5:302020-05-05T15:08:27+5:30

मिरजच्या कोव्हीड टेस्टींग लॅबमध्ये बजावतेय कर्तव्य

CoronaVirus: mother says come at home; But I say, I want to serve! | CoronaVirus : काळजीपोटी आई म्हणतेय निघून ये; पण मी सांगते, मला सेवा करायचीय!

CoronaVirus : काळजीपोटी आई म्हणतेय निघून ये; पण मी सांगते, मला सेवा करायचीय!

googlenewsNext
ठळक मुद्देबीडच्या कन्येचा कोरोना विरोधात लढा

- सोमनाथ खताळ

बीड : कुटूंबातील सर्वांचे फोन येतात. हे कर ते कर म्हणून सारखं काळजी करतात. आईचा तर काळजीपोटी जीव कासावीस होतो. सुरूवातीला आईला खुप काळजी असायची ‘बाळा तु निघून ये’ म्हणत ती विनंती करीत होती. परंतु समजावून सांगत काळजी घेत असल्याबाबतचा विश्वास दिला. आज निघून ये म्हणणारी आईच मला सेवा कर असा सल्ला देतेय, ही बाब मला लढण्याचे बळ देणारी आहे, असे भावनिक उद्गार बीडच्या डॉ.कोमल कैलास बियाणी यांचे आहेत. त्या सध्या मिरज (जि.सांगली) येथील कोव्हीड टेस्टींग लॅबमध्ये कर्तव्य बजावत आहे.

सध्या आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण, पत्रकार असे सर्वच कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. बीडची कन्या डॉ.कोमल या देखील मिरजमध्ये आहेत. ज्या संशयीत रुग्णांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत आणले जातात, त्याच प्रयोगशाळेत त्या दिवसरात्र कर्तव्य बजावतात. मिरजला व्हायरॉलॉजी लॅब आहे. येथे सर्व प्रकारच्या तपासणी होता. सध्या येथे केवळ कोव्हीडची टेस्ट होते. स्वॅब येताच त्याची नोंदणी करणे. नंतर स्वॅब पाहून कोव्हीडची ‘जीन’ टेस्ट केली जात.े या सर्व प्रक्रियेला पीसीआर (पॉलीमरेज चेन रिअ‍ॅक्शन) म्हणतात. एका टेस्टसाठी साधारण आठ ते नऊ तास लागत असल्याचे डॉ.कोमल सांगतात.  

३१ मार्चला या लॅबमध्ये पहिल्यांदाच एकाच कुटूंबातील चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आम्ही खुप घाबरलो होतो. पण पळूण चालणार नव्हते. आज आत्मविश्वास वाढला आहे. आपण जर काळजी घेतली तर हा विषाणूचा संसर्ग आपल्याला होऊ शकत नाही याची खात्री पटली. माझ्यासह माझे सर्व सहकारी, मार्गदर्शक यांच्यासह विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी येथे मन लावून काम करीत आहेत. मला या लढ्यात सहभागी होऊन सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजते. हा लढा जिंकण्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, असेही डॉ.कोमल यांनी सांगितले. 

कुटूंब रोज व्हिडीओ कॉल करून पाहतात

आमचे एकत्रित कुटूंब आहे. सर्वांना माझी काळजी आहे. रोज कॉल करतात. रोज व्हिडीओ कॉल करून मला पाहतात. त्यामुळे त्यांना आणि मला समाधान मिळते. त्यांना पाहून मला लढण्याची उर्जा मिळते. आजी गंगाबाई, वडील कैलास, आई सुनिता, काका भगिरथ, काकू तारा, मोठे काका बाळकिसन, मोठ्या काकू पे्रमा, भाऊ पवन, बहिण काजल, श्रुती, श्रेया, भाऊ इंजि. प्रविण, वहिणी स्नेहा हे सर्व मला लढण्यासाठी प्रेरणा देतात, असे डॉ.कोमल बियाणी यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षण बीड तर एमबीबीएस जळगाव 

कोमल बियाणी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडमधील द्वारकादास राजस्थानी विद्यालयात झाले. नंतर उच्च शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. सुरूवातीपासून डॉक्टर होऊन रुग्ण सेवा करण्याची त्यांचे स्वप्न होते. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांचा वैद्यकीय प्रवेश झाला. जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले. आता त्या मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी करत असून एम.डी. (मायक्रोबायलॉजी) होण्यासाठी त्या केवळ एक पाऊल दुर आहेत.

युद्ध सोडून सैन्याला परत नाही बोलावणार

डॉ.कोमल यांना लग्नाचे स्थळ येऊ लागले आहेत. अनेकांनी त्यांना बोलावून घ्या. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊ असे अनेकांनी सांगितले. परंतु सध्या युद्ध सुरू आहे. आणि माझी मुलगी या युद्धात सैन्याची भूमिका बजावत आहे. युद्ध सोडून सैन्याला बोलावणार नाही, अशी प्रतिक्रिया कोमलचे वडिल कैलास बियाणी यांनी दिली. 

मी संधीचे सोनं करेलमी

मेहनत घेऊन डॉक्टर झाले. सामान्यांची सेवा करण्याची इच्छा होती. डॉक्टर झाल्यामुळे पूर्ण करता येत आहे. त्यातच आता आपल्यावर कोसळलेल्या या संकटात एक योद्धा म्हणून लढण्याची मला संधी मिळाली आहे. या संधीचे मी नक्कीच सोनं करेल. माझे कुटूंब मला आधार देत आहे. तर सर्व ग ुरू, सहकारी, मित्र हे लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल, हे नक्की.

- डॉ.कोमल बियाणी

Web Title: CoronaVirus: mother says come at home; But I say, I want to serve!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.