CoronaVirus : मनसेने करून दाखवले; ग्रामीण भागात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:02 PM2021-05-08T17:02:23+5:302021-05-08T17:04:06+5:30

CoronaVirus : लताई कोविड सेंटर येथे ५० बेडची व्यवस्था असून ४ डॉक्टरांसह १२ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत.

CoronaVirus: MNS did it; Covid care center of 50 beds started in rural areas of Kaij taluka | CoronaVirus : मनसेने करून दाखवले; ग्रामीण भागात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले

CoronaVirus : मनसेने करून दाखवले; ग्रामीण भागात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले

googlenewsNext
ठळक मुद्दे या सेंटरमुळे शिरुरघाट व परिसरातील रुग्णांची मोठी सोय दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेची ठरत आहे.

केज : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जिल्ह्याला मोठा फटका बसला असून शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे ग्रामीण भागातच रुग्णांच्या उपचाराची सोय होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारातून आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने शिरुरघाट येथे लताई कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. केज तालुक्यात राजकीय पक्षाच्या पुढाकारातून सुरू झालेले हे एकमेव कोविड सेंटर आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेची ठरत आहे. आरोग्य सुविधा अपुरी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यास मनसे तयार असून आवश्यक त्या परवानग्या द्याव्या अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणी सतत पाठपुरावा केल्यानंतर शिरुरघाट सेंटर सुरु करण्याची परवानगी मिळाली. यानंतर मनसेच्या पुढाकारातून आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी येथील लताई कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. यावेळी तहसीलदार दूलाजी मेंडके, मनसेचे जिल्हााध्यक्ष सुमंत धस, आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ.रामेश्वर तांबडे, लताई कोविड सेंटरचे आरोग्य अधिकारी नामदेव दोडके उपस्थित होते.

लताई कोविड सेंटर येथे ५० बेडची व्यवस्था आहे. येथे ४ डॉक्टरांसह १२ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच रुग्णांवर उपचारासोबतच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, संगित रजनी, मनोरंजनाचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. दरम्यान, कार्यक्रमात तहसीलदार मेंडके, गटविकास अधिकारी दराडे आणि आरोग्य अधिकारी आठवले यांनी या सेंटरमुळे शिरुरघाट व परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष कल्याण केदार, गोविंद हाके, गुणवंत सांगळे, विक्रम सांगळे, राजेंद्र घोळवे, विजय हंगे, अमोल केदार आदींची उपस्थिती होती. 

दानशुरांनी पुढे यावे
केवळ निवडणुकीपुरते जनतेसमोर न जाता ते अडचणीत असताना मदत करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. रुग्णांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करण्यासाठी दानशुरांनी मदत करावी. इतर राजकीय पक्षांनीही पुढाकार घेऊन कोविड सेंटर करावे असे.
- सुमंत धस, मनसे, जिल्हाध्यक्ष 

Web Title: CoronaVirus: MNS did it; Covid care center of 50 beds started in rural areas of Kaij taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.