coronavirus : बीडमध्ये इंटरनेट सेवा नसल्याने प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:02 PM2020-03-17T14:02:54+5:302020-03-17T14:05:17+5:30

आरोग्य विभाग सार्वाधिक महत्वाचा असतानाही याच विभागाला अद्याप सेवा मिळाली नसल्याचे समोर आले आहे. 

coronavirus: Beed does not have internet service, so it hinders administration planning for corona virus | coronavirus : बीडमध्ये इंटरनेट सेवा नसल्याने प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ

coronavirus : बीडमध्ये इंटरनेट सेवा नसल्याने प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ

Next
ठळक मुद्दे‘बीएसएनएल’चा गलथान कारभार सुधरेनाबीडचा आरोग्य विभाग हतबल

बीड : कोरोना विषाणूची दहशत सध्या राज्यात सर्वत्र आहे. गर्दी टाळून नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशसनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. एकत्र न येता बैठका, माहिती ही आॅनलाईन पाठविण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु बीड जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा कोलमडल्याने या नियोजनाला हरताळ फासल्याचे दिसत आहे. त्यातच आरोग्य विभाग सार्वाधिक महत्वाचा असतानाही याच विभागाला अद्याप सेवा मिळाली नसल्याचे समोर आले आहे. 

कोरोना विषाणूचे संशयीत राज्यात आढळत आहेत. त्यातच मंगळवारी एकाचा बळीही गेला आहे. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करीत आहेत. तर प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. गर्दी कमी करणे, एकत्र न येणे, बैठका टाळणे आदी सुचना देऊन माहिती आॅनलाईन देणे, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देणे, आॅडिओ क्लिप तयार करून देणे, इमेलद्वारे देणे, वेबसाईडवर अपलोड करण्याबाबत सांगितले होते. परंतु बीडमध्ये इंटरनेट सेवा मिळत नसल्याने प्रशासनाला अनंत अडचणी येत आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाने तर २० हजार रूपये प्रति कनेक्शन प्रमाणे देऊन ५९ ठिकाणी अर्ज केले होते. परंतु अद्यापही ३१ ठिकाणी सेवा बंद आहे. याबाबत आरोग्य विभागाने तब्बल १० पत्रे दिली. तसेच खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनीही भेट घेतली, परंतु यावर कसल्याच उपाययोजना झाल्या नाहीत. आता जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतरही मंगळवारी आरोग्य संस्थेतील सेवा बंदच होती. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. 
‘व्ही.सी.’ घ्यायची कशी?
एकत्रीत न येता बैठका घेणे आवश्यक आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाची महत्वाची भूमिका आहे. आता या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेणे आवश्यक आहे. परंतु सेवा नसल्याने त्या घ्यायच्या कशा? असा प्रश्न आहे. उपाययोजना, जनजागृती, माहिती अपलोड करण्यासाठी आरोग्य विभागाला खाजगी दुकानांचा आधार घ्यावा लागत असल्याचे सांगण्यात आले. 
लवकरच सेवा सुरळीत होईल 
आरोग्य विभागाचे कनेक्शन जोडण्यासाठी पथक गेले आहे. तसेच सर्व अडचणी दुर करून सेवा देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरच सर्व सुरळीत होईल. 
- राजेश हेडाव, व्यवस्थापक, बीएसएनएल, बीड

इंटरनेट नसल्याने माहिती देण्यास अडचण 
आतापर्यंत १० वेळा पत्र दिले आहे. कोरोना संदर्भात एकत्रीत न येता माहिती जमा करण्यासाठी इंटरनेट महत्वाचे आहे. वरंवार पत्र देऊनही सेवा मिळत नाही. आम्ही शुल्कही भरले आहे. इंटरनेट बंद असल्याने वरिष्ठांना माहिती देताना खुप अडचणी येत आहेत. 
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: coronavirus: Beed does not have internet service, so it hinders administration planning for corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.