Corona's infection to two daughter in law, followed by father-in-law; Beed has 69 patients | सासऱ्यापाठोपाठ दोन सुनांना कोरोनाची लागण; बीडची रुग्णसंख्या ६९

सासऱ्यापाठोपाठ दोन सुनांना कोरोनाची लागण; बीडची रुग्णसंख्या ६९

बीड : धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथील एका वृध्दाला शुक्रवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाईकांचे स्वॅब घेतले असता, दोन सूनांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६९ झाली आहे. ५३ कोरोनामुक्त झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. १५ जणांवर उपचार सुरु असून, एक महिला औरंगाबादेत उपचार घेत आहे. शनिवारी जिल्ह्यातून ५३ स्वॅब लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. पैकी ४७ निगेटिव्ह आले, तर ४ अनिर्णित राहिले.

दरम्यान, अंबेवडगाव येथील वृध्दाच्या संपर्कातील जवळपास १४ लोकांचे स्वॅब घेतले होते. वृध्दाला माजलगावला दवाखान्यात घेऊन गेलेल्या दोन्ही मुलांच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर होम क्वारंटाईन असलेल्या दोन्ही सूना मात्र कोरोनाबाधित आढळल्या आहेत.

Web Title: Corona's infection to two daughter in law, followed by father-in-law; Beed has 69 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.