Corona Virus In Beed : धनंजय मुंडेंच्या 'नाथ प्रतिष्ठान'चे मोठे कार्य; ५ हजार गोरगरिबांना दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 05:15 PM2020-03-26T17:15:35+5:302020-03-26T17:31:00+5:30

परळीत ५००० गरजूंना किराणा सामानाचे वाटप

Corona Virus In Beed: Helping hand of Dhananjay Munde's 'Nath Pratishthan' to 5,000 poor people in Parali | Corona Virus In Beed : धनंजय मुंडेंच्या 'नाथ प्रतिष्ठान'चे मोठे कार्य; ५ हजार गोरगरिबांना दिला मदतीचा हात

Corona Virus In Beed : धनंजय मुंडेंच्या 'नाथ प्रतिष्ठान'चे मोठे कार्य; ५ हजार गोरगरिबांना दिला मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्देगरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामानाचे वाटप.असंघटित क्षेत्रातील कामगारांना घरपोच मदत

परळी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम - हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या 'नाथ प्रतिष्ठान'च्या वतीने अशा ५००० गरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्यात येत आहे.

अशा गरजू लोकांची परळी शहराच्या विविध भागातून एक यादी बनवण्यात आली असून, कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नसून, शासकीय नियमांचे पालन करीत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे. आज व उद्या हे वाटप केले जाणार असून आणखी कोणी गरजू असल्यास त्यांनी आपापल्या प्रभागातील नगरसेवक किंवा नाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क करावा, कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन नाथ प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड , सचिव नितीन कुलकर्णी यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु ज्या गरीबांचे निव्वळ हातावर पोट आहे, अशा लोकांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ शकते, यामुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीतील  अशा ५००० लोकांची यादी करून त्यांना मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद असे साधारण २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप केले जात आहे.

Web Title: Corona Virus In Beed: Helping hand of Dhananjay Munde's 'Nath Pratishthan' to 5,000 poor people in Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.