Corona Virus in Beed : हातावर पोट असणाऱ्यांना मदतीचा हात; अंबाजोगाईत 100 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 04:43 PM2020-03-26T16:43:03+5:302020-03-26T16:43:29+5:30

१०० कुटुंबीयांना मदतीचा हात

Corona in Beed : Distribution of essential commodities to 100 families in Ambajogai | Corona Virus in Beed : हातावर पोट असणाऱ्यांना मदतीचा हात; अंबाजोगाईत 100 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Corona Virus in Beed : हातावर पोट असणाऱ्यांना मदतीचा हात; अंबाजोगाईत 100 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next

अंबाजोगाई-: लॉक डाऊन व संचारबंदीत रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक विवंचनेत असणाऱ्या १०० कुटुंबांना सामाजिक भावनेतून मदतीचा हात मिळाला आहे. त्यांना एकवीस दिवस लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण माजी उपनगराध्यक्ष सारंग अरुण पुजारी यांच्यावतीने शहरातील प्रभाग तीन मध्ये करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे.शहरात हि संचारबंदी सुरू आहे.पुढे एकवीस दिवस घरात राहुन काढायचे.अशा स्थितीत गरीब व रोजनदारी वर काम करणाऱ्या कुटुंबाची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. प्रभाग तीन मध्ये बांधकाम मजूर,टपरी कामगार व दैनंदिन मजुरी करणारे कुटुंबे आहेत.संचारबंदीत या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालणार.त्यांना आताच खऱ्या मदतीची गरज ओळखून नगरसेवक सारंग पुजारी यांनी या कुटुंबाना पुढील एकवीस दिवस पुरेल इतक्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून त्यांचे वितरण घरोघरी जाऊन सुरू केले आहे. प्रभागातील १०० कुटुंबाना हे वितरण करण्यात आले. यातून स्व. माजी नगराध्यक्ष अरुणमामा पुजारी  यांच्या विचारांचा वारसा सारंग पुजारी ही  जोपासताना दिसत आहेत.

Web Title: Corona in Beed : Distribution of essential commodities to 100 families in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.