बीडमध्ये २५३ आरोग्य उपकेंद्रात येणार ‘सीएचओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:45 PM2020-02-13T23:45:48+5:302020-02-13T23:46:15+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात आता समुदाय आरोग्य अधिकारी (कम्यूनिटी हेल्थ आॅफिसर) नियूक्त करण्यात येणार आहेत.

CHO to come to Bid | बीडमध्ये २५३ आरोग्य उपकेंद्रात येणार ‘सीएचओ’

बीडमध्ये २५३ आरोग्य उपकेंद्रात येणार ‘सीएचओ’

Next
ठळक मुद्देभरती गतिमान : आरोग्य विभागाकडून कागदपत्रांची छाननी सुरू

बीड : जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात आता समुदाय आरोग्य अधिकारी (कम्यूनिटी हेल्थ आॅफिसर) नियूक्त करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या भरती प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. निवड झाल्यावर सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते प्रत्यक्षात काम करणार आहेत. यामुळे सामान्यांना तत्पर आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
बीड जिल्ह्यात सध्या तीन उपजिल्हा रुग्णालये, ११ ग्रामीण रुग्णाालये, ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २९४ आरोग्य उपकेंद्र आहेत. ज्या ठिकाणी उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याच गावात उपकेंद्र असेल तर तेथे सीएचओ नियुक्ती केले जाणार नाही. संलग्न असलेल्या २५३ आरोग्य उपकेंद्रात ही पदे भरली जाणार आहेत. २५३ जागांसाठी ७९६ अर्ज आले होते. पैकी ७२६ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. २ फेब्रुवारी रोजी लातूर येथे परीक्षा घेण्यात आली. यात ६०१ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. २२ पेक्षा जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांना बोलावण्यात आले असून सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यासाठी चार पथकांची नियूक्तीही करण्यात आली आहे.
सर्व प्रक्रिया पूर्ण होताच सर्वांचे समुपदेशन केले जाईल. नियूक्त झालेल्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील केज, बीड व परळी येथे १८० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. राहिलेल्या. ७३ उमेवारांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यांचे वेतन २५ हजार एवढे राहणार असून कामानुसार पुढील १५ हजार रूपये वाढविले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे आदी पथके कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत.
‘सीएचओं’ची काय मदत होणार ?
उपकेंद्रातील सीएचओ हे घरोघरी जावून आजारांची माहिती घेणे, प्रथमोपचार करणे, गर्भवती मातांची नोंदणी करणे, शासनाच्या विविध योजनांची माहितीचा प्रचार व प्रसार करणे, आरोग्य केंद्र व नागरिक यांच्यातील दुआ म्हणून काम करणार आहेत.विविध १३ कामांमधून त्यांची १५ हजार रूपये वेतन वाढणार आहे. यामुळे सामान्यांना तत्पर व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

जिल्ह्यातील २५३ आरोग्य उपकेंद्रात प्रत्येककी एक असे समुदाय आरोग्य अधिकारी नियूक्त केले जाणार आहेत. सध्या कागपत्रांची पडताळणी सुरू आहे. पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
- डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: CHO to come to Bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.