कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:18+5:302021-05-08T04:36:18+5:30

सुरुवातीला कोरोनाबाधितांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणे, गरजेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध करणे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आवश्यक असल्यास रेमडेसिविर ...

Awareness on behalf of Corona Patient Services Committee | कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने जनजागृती

कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने जनजागृती

Next

सुरुवातीला कोरोनाबाधितांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणे, गरजेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध करणे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आवश्यक असल्यास रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक पाण्याची उपलब्धता करणे, प्रशासन व आरोग्य विभागाला आवश्यक ती मदत करणे या बाबींना प्राधान्य देत रुग्णसेवा समितीने कार्य सुरू केले. तालुक्यामध्ये वाढती रुग्णसंख्या व कोरोनाविषयी जनतेच्या मनातील भीती, लस घेण्याबद्दलचे गैरसमज तसेच शारीरिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, साबणाने वारंवार हात धुणे, त्याचबरोबर घराच्या बाहेर न पडणे, या सर्व बाबींविषयीची जनजागृती करण्यासाठी कोरोना रुग्णसेवा समितीचा सदस्य प्रत्येक वॉर्डात, गल्ली, चौकाचौकांत, तसेच तालुक्यातील ताकडगाव, किनगाव, कोल्हेर, हिंगणगाव, रेवकी, पांढरवाडी इत्यादी ग्रामीण भागात जात आहेत. ॲड. सुभाष निकम, कैलास टोणपे, सुमेध भोले, दीपक लांडगे हे गीतांद्वारे व मौखिक स्वरूपात डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन करत आहेत. कोरोनाविषयक भीती दूर करून सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, असे वेळोवेळी आवाहन केले. यावेळी संजय काळे, राजाभाऊ आतकरे, डॉ. अनिल दाभाडे, बाळासाहेब सानप, दादासाहेब घोडके, प्रा. राजेंद्र बरकसे, ॲड. कल्याण काळे, शिरीष भोसले, डॉ. मुरलीधर मोटे, प्रा. शरद सदाफुले, अमित शिखरे, उत्तम सोलाने, प्रशांत गोलेच्छा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या जनजागृती अभियानाचे ग्रामीण भागातील जनतेत विशेष कौतुक होत आहे.

===Photopath===

070521\sakharam shinde_img-20210507-wa0031_14.jpg

Web Title: Awareness on behalf of Corona Patient Services Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.