आदित्य ठाकरेंसमोर समस्या मांडताच स्वच्छतेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:26 AM2019-08-06T00:26:36+5:302019-08-06T00:27:45+5:30

जिल्हा रूग्णालयातील घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचेच आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा आदीत्य ठाकरे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता. यावर सोमवारी युवासेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन स्वच्छतेला सुरूवात केली.

Aditya Thackeray started cleaning up as he presented the problem | आदित्य ठाकरेंसमोर समस्या मांडताच स्वच्छतेला सुरुवात

आदित्य ठाकरेंसमोर समस्या मांडताच स्वच्छतेला सुरुवात

Next
ठळक मुद्देबीड जिल्हा रूग्णालय : तात्पुरती नको, कायमस्वरूपी उपाययोजना करा

बीड : जिल्हा रूग्णालयातील घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचेच आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा आदीत्य ठाकरे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता. यावर सोमवारी युवासेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन स्वच्छतेला सुरूवात केली. मात्र, रूग्णालयातील ड्रेनेजचा प्रश्न अतिगंभीर आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे हे ‘आदित्य संवाद’ यात्रा घेऊन बीड जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी महिला व युवतींशी संवाद साधला होता. एका मुलीने जिल्हा रूग्णालयातील घाणीच्या साम्राज्याबद्दल मुद्दा उपस्थित केला. यावर सोमवारी तात्काळ युवासेना राज्यविस्तारक व सहसचिव विपुल पिंगळे, शिवराज बांगर, जिल्हा युवाअधिकारी सागर बहीर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची भेट घेतली. बांधकाम विभागाला संपर्क करून तात्काळ स्वच्छता करून घेतली. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील ड्रेनेजचा प्रश्न हा अतिगंभीर आहे. याबाबत रूग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. मात्र, यावर कसलीच कारवाई झाली नाही. युवासेनेनेही तक्रारीची दखल घेत स्वच्छता करून घेतली. परंतु यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून रूग्ण व नातेवाईकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी यासंदर्भात सोमवारी पुन्हा बांधकाम विभागाला पत्र दिल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Aditya Thackeray started cleaning up as he presented the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.