रक्तदान करून परतताना व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:04 AM2020-01-14T00:04:23+5:302020-01-14T00:04:43+5:30

माजलगावच्या शिबिरात रक्तदान करुन परतणा-या व्यापा-यास अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या व्यापा-याचे उपचार सुरु असताना निधन झाले.

Accidental death of a trader returning with blood donation | रक्तदान करून परतताना व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू

रक्तदान करून परतताना व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू

Next
ठळक मुद्देभोगलवाडी फाट्यावर घडली घटना

दिंद्रूड : माजलगावच्या शिबिरात रक्तदान करुन परतणा-या व्यापा-यास अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या व्यापा-याचे उपचार सुरु असताना निधन झाले. ही घटना रविवारी रात्री दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीतील कारीजवळील भोगलवाडी फाट्यावर घडली.
प्रदीप गुन्नाल (वय ४७ वर्षे) असे त्या मयत व्यापाºयाचे नाव आहे. त्यांचे धारुर येथील वडगावकर गल्लीत किराणा व जनरल स्टोअर्स आहे. रविवारी ते माजलगाव येथे जिव्हाळा प्रतिष्ठाण आयोजित शिबिरात रक्तदान करण्यासाठी आले होते. रक्तदानानंतर दुचाकीवरुन धारुरकडे येत असताना गुन्नाल यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. सदरील अपघात कारी जवळील भोगलवाडी फाट्यावर झाला. यात गंभीर जखमी होवून प्रदीप गुन्नाल यांचे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सोमवारी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रदिप गुन्नाल हे शिवशंकर गणेश मंडळाचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी तहसील कार्यालयात निराधार योजना विभागात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते वैद्यकीय अधिकारी अंबादास गुन्नाल यांचे चुलत बंधू होत.

Web Title: Accidental death of a trader returning with blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.