610 students of Beed district decided to get scholarships | बीड जिल्ह्यातील ६१० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक
बीड जिल्ह्यातील ६१० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून दोन्ही परीक्षेत एकूण ६१० विद्यार्थीशिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेसाठी इयत्ता पाचवीतील ११ हजार २०१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १० हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात १७५६ विद्यार्थी पात्र तर ९१५५ विद्यार्थी अपात्र ठरले. ३६६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. पात्रतेची टक्केवारी १६.०९ इतकी आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता आठवीतील ८५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ८ हजार ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ११५१ विद्यार्थी पात्र तर ७१४९ विद्यार्थी अपात्र ठरले. ३५० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पात्रतेची टक्केवारी १३.८६ इतकी आहे.


Web Title: 610 students of Beed district decided to get scholarships
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.