माजलगाव नगरपालिकेत ४ कोटीचा अपहार; तीन मुख्याधिकार्‍यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:43 AM2019-12-24T11:43:06+5:302019-12-24T11:52:46+5:30

पदाचा व अधिकारांचा दुरूउपयोग करून शासकिय अभिलेखामध्ये बनावट नोंदणी घेतल्या.

4 crore corruption in Majalgaon Municipality; Seven were booked including three chiefs officers | माजलगाव नगरपालिकेत ४ कोटीचा अपहार; तीन मुख्याधिकार्‍यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

माजलगाव नगरपालिकेत ४ कोटीचा अपहार; तीन मुख्याधिकार्‍यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्दे4 कोटी 13 लाखाचा केला अपहार उघडकीसई-निविदा कार्यप्रणाली डावलली

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव  : माजलगाव नगर परिषदेला विकास कामासाठी आलेल्या 4 कोटी 13 लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित, लक्ष्मण राठोड व सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह सात जणांवर शहर ठाण्यात मंगळवारी पहाटे 3 वा. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव नगर परिषदेला शासनाने विविध योजनेतून कोट्यावधी रूपयांचा निधी दिला होता. परंतू तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित, लक्ष्मण राठोड व सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल अशोक भिमराव कुलकर्णी (वांगीकर), अंगद लिंबाजी हजारे, सुर्यकांत ज्ञानोबा सुर्यवंशी, कैलास रांजवण या सात जणांनी पदाचा व अधिकारांचा दुरूउपयोग करून शासकिय अभिलेखामध्ये बनावट नोंदणी घेतल्या.

3 लाखापेक्षा अधिक रक्कमेच्य कामाची ई-निविदा कार्यप्रणाली राबवणे बंधनकारक असतांना तसे न करता, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकिय रक्कम 4 कोटी 13 लाख 97 हजार 942 रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात मंगळवारी पहाटे 3 वा. न.प.चे स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड याच्या फिर्यादीवरून वरिल तीन मुख्याधिकार्‍यासह चार लेखापालावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करत आहेत.

Web Title: 4 crore corruption in Majalgaon Municipality; Seven were booked including three chiefs officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.