तीन दिवसांमध्ये ११ शेळ्या दगावल्या; हतबल शेतकरी चढला पाणी पुरवठा टाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 06:50 PM2021-10-14T18:50:12+5:302021-10-14T18:54:33+5:30

आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल

11 goats slaughtered in three days; The helpless farmer climbed on the Water tank | तीन दिवसांमध्ये ११ शेळ्या दगावल्या; हतबल शेतकरी चढला पाणी पुरवठा टाकीवर

तीन दिवसांमध्ये ११ शेळ्या दगावल्या; हतबल शेतकरी चढला पाणी पुरवठा टाकीवर

Next

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे तीन दिवसांत ११ शेळ्यांचा मृत्यू झाल्याने हतबल शेतकरी आज चक्क पाण्याच्या टाकीवर चढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि प्रशासनाच्या आवाहनानंतर शेतकरी खाली आल्याची माहिती आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील शेतकरी किसन भाऊजी पवार वय (६५) यांच्या शेळ्याचा मृत्यू दि १२ ऑक्टोबर पासून होत असून आजपर्यंत ११ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने  झाला? याची माहिती नाही आर्थिक नुकसान होत असल्याने हतबल झालेले  पवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाणी पुरवठा टाकीवर चढले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. ग्रामीण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, प्रशासनाच्या मोठ्या प्रयत्नानंतर शेतकरी टाकीच्या खाली उतरला आला असल्याची माहिती आहे. 

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पक्षीय एकजूट
गेवराई तालुक्यात गेल्या महिन्यात पाच ते सहा वेळा अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तालुक्यातील अनेक पाझर तलाव,बंधारे फुटुन गेले त्याची दुरूस्ती करावी, रस्त्याची व पुलाची वाताहात झाली त्यांची दुरूस्ती करावी, बॅकेची कर्ज वसुली थांबवावी, एफआरपीचे पैसे देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी आज दुपारी आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतक-याच्या न्याय हक्कासाठी सर्व पक्षीय संताप मोर्चा काढण्यात आला. 

Web Title: 11 goats slaughtered in three days; The helpless farmer climbed on the Water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.