माजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:10 PM2020-09-21T13:10:07+5:302020-09-21T13:14:10+5:30

 धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले होते.  धरणाची पाणी पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे.

11 gates of Majalgaon dam opened by one meter | माजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले

माजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले

googlenewsNext

माजलगाव - माजलगाव धरण क्षेत्रात मागील चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रविवारी रात्री उशिरापासून धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून धरणातून सिंदफना पात्रात ४३ हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासूनच यावर्षी धरणाची पाणी पातळी वाढत होती. धरण बुधवारी संध्याकाळी पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले होते.  धरणाची पाणी पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे. रविवारी धरणाच्या ११ दरवाज्यांपैकी ५ दरवाजे एक मीटरने तर ६ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. रविवारी रात्रीपासून धरणात ३१ हजार ४२३ क्युसेस पाण्याची आवक होती. सोमवारी दुपारी १२ वाजता पाण्याची आवक ४२ हजार ७६५ झाल्याने तेवढ्याच क्षमतेने धरणाचे पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर. शेख यांनी दिली.

Web Title: 11 gates of Majalgaon dam opened by one meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.