सकाळी उठल्यानंतर 'या' चुका कराल तर वयाआधीच म्हातारे दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:40 PM2020-02-05T14:40:47+5:302020-02-05T14:48:06+5:30

प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं असतं की आपण नेहमी तरूण दिसावं.

Your mistakes of early morning it will cause ageing to skin | सकाळी उठल्यानंतर 'या' चुका कराल तर वयाआधीच म्हातारे दिसाल

सकाळी उठल्यानंतर 'या' चुका कराल तर वयाआधीच म्हातारे दिसाल

Next

प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं असतं की आपण नेहमी तरूण दिसावं. म्हणून मुलं आणि मुली सध्याच्या काळात आपल्या शरीरावर आणि लूक वर खूप मेहनत घेत असतात. काहीजणी जीमला जातात. तर काही  आपल्या केसांवर वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही ज्या चुका करता त्यामुळे तुम्ही वयाआधीच म्हातारे दिसू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही वयाआधीच म्हातारे दिसू शकता.

गरम पाण्याने अंघोळ करणे

सकाळी थंडीचं वातावरणं असतं म्हणून अनेकांना जास्त गरम असलेल्या पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसायला  सुरूवात होते.  त्यासाठी अंघोळ करताना  कोमट पाण्याचा वापर करा. 

नाष्ता न करणे

सकाळी कामासाठी बाहेर पडण्याची घाई असल्यामुळे अनेक महिला घरातील काम आवरून काहीही न खाताच घराबाहेर पडतात. या सवयीमुळे आरोग्याचं मोठं नुकसान होत असतं.  सकाळचा नाष्ता न केल्यामुळे  शरीराला उर्जा मिळत नाही. त्यामुळे अनेक तास उपाशी राहील्यामुळे थकवा येत असतो. परिणामी त्वचेचं सौंदर्य कमी होतं. 

सिगारेट

Image result for cigarette

काही लोकांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर आधी सिगारेट लागतेच. पण असं केल्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम पडत असतो. इतकंच नाही तर त्वचेवर सुद्धा वाईट परिणाम होतो. कमी वयात सुद्धा वृद्ध असल्यासारखी त्वचा दिसते. त्यामुळे लगेच नाही पण शक्य होईल तितक्या लवकर सिगारेट ओढणं बंद करा. नाहितर कमी वयातचं तुम्ही म्हातारे दिसाल. ( हे पण वाचा-सेलिब्रिटींचा बर्फाने तोंड धुण्याचा 'हा' फंडा तुम्हालाही आवडेल, साध्या पाण्याने तोंड धुणं सोडाल!)

पाणी पिण्याकडे दुर्लक्ष

सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता असते. त्यासाठी उठल्यानंतर सगळ्यात आधी त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी पोटभर पाणि प्या. दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाण्याचे सेवन करा. ( हे पण वाचा-पेपर अँन्ड सॉल्ट दाढी ठेवण्याचा हटके ट्रेन्ड, हॅण्डसम दिसण्याचा 'हा' बेस्ट फंडा!)

Web Title: Your mistakes of early morning it will cause ageing to skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.