गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 02:34 PM2019-07-15T14:34:51+5:302019-07-15T14:38:38+5:30

अनेकजण दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. कारण गरम पाण्याने जास्त आराम मिळतो.

You should not wash your hair with hot water for these reason | गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

Next

(Image Credit : coconutsandkettlebells.com)

अनेकजण दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. कारण गरम पाण्याने जास्त आराम मिळतो. पण गरम पाण्याने तुमच्या केसांचं नुकसान होतं. आंघोळ करताना केस भिजलेले असताना ते तुटण्याची संख्या अधिक वाढते. त्यामुळे प्रयत्न हा करावा की, फार जास्त गरम पाण्याने केस धुवू नये. चला जाणून घेऊ गरम पाण्याने केस धुण्याचे तोटे काय काय होतात.

१) केसांची मूळं कमजोर होतात - आंघोळ करतेवेळी गरम पाण्याने डोक्याची रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे केसांचं मूळं कमजोर होतात. अशात गरम पाण्याने आंघोळ केल्यास केसगळतीची समस्या होऊ लागते.

(Image Credit : beautyhairguide.com)

२) केस जळण्याचा धोका - गरम पाण्याने केस जळण्याचा देखील धोका असतो. केस हे केराटिन प्रोटीनने तयार झालेले असतात. गरम पाणी केसांच्या संपर्कात येताच हे प्रोटीन जळण्याचा धोका असतो. प्रोटीन जळाल्याने केस खराब होतात.

३) केसगळतीची समस्या - जर तुम्ही शॅम्पूने केस धुवत असाल गरम पाण्याचा वापर करू नका. कारण याने केसांचं नुकसान होतं. शॅम्पू आणि गरम पाणी एकत्र झाल्याने केसगळती अधिक होते.

४) कंडीशनरचा प्रभाव कमी होणे - केसांमध्ये कंडीशनर केल्यानंतर कधीही केस गरम पाण्याने धुवू नका. असं केल्यास केसांच्या कंडीशनरचा प्रभाव नष्ट होतो. गरम पाण्यामुळे कंडीशनरचा मुलायमपणा धुतला जातो. 

(Image Credit : Ashley Heating)

५) केसांसोबत त्वचा आणि डोक्याचं नुकसान - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचं नुकसान होण्यासोबतच तुमच्या त्वचेचं आणि डोक्याचंही नुकसान होतं. याने त्वचेवर लाल चट्टे किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे केस गरम पाण्याने धुणे तोट्याचं ठरतं.

Web Title: You should not wash your hair with hot water for these reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.