Oily Skin Care Tips : त्वचेच्या तेलकटपणामुळे आता चेहरा लपवण्याची गरज पडणार नाही, करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:27 AM2020-01-10T11:27:29+5:302020-01-10T11:30:58+5:30

Oily Skin Care Tips : काही लोकांना नेहमीच तेलकट त्वचेची समस्या असते. त्यामुळे ना त्यांना व्यवस्थित मेकअप करता येत आणि केलं तर ते फार काळ टिकत नाही.

You must try these home remedies oily skin | Oily Skin Care Tips : त्वचेच्या तेलकटपणामुळे आता चेहरा लपवण्याची गरज पडणार नाही, करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

Oily Skin Care Tips : त्वचेच्या तेलकटपणामुळे आता चेहरा लपवण्याची गरज पडणार नाही, करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

googlenewsNext

काही लोकांना नेहमीच तेलकट त्वचेची समस्या असते. त्यामुळे ना त्यांना व्यवस्थित मेकअप करता येत आणि केलं तर ते फार काळ टिकत नाही. काही लोकांच्या त्वचेमध्ये तेल ग्रंथी जास्त असतात. त्यामुळे काही लोकांची त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेची सामान्य त्वचेपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागते. अनेकांना या सततच्या तेलकटपणापासून सुटका हवी असते. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टीप्स घेऊन आलो आहोत. या घरगुती टीप्सच्या माध्यामातून तुम्ही चेहऱ्यावरचा तेलकटपणा सहज दूर करू शकता.

- त्वचा ऑईल फ्रि करण्यासाठी नैसर्गिक गुण असलेल्या फेसवॉशचा वापर करा. कधीही ग्लीसरीन असलेल्या साबणाचा वापर करा. 

- आठवड्यातूल एकडा लाइट स्क्रबचा वापर करा कारण तेलकट त्वचेची क्लीजिंग गरजेची असते. मसाज केल्याने धूळ, माती, मेकअप निघून जातं. त्यामुळे त्वचेची छिद्रे साफ होतात. याप्रकारे तुम्ही ब्लॅक हेटसारख्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. 

- चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर बेसणाने चेहरा धुवा. 

- कडूलिंबाच्या पाने उकळून गाळून घ्या. हे पाणी चेहऱ्यावर लावा. 

- चंदन पावडर आणि पपईचा पॅक तयार करुन चेपऱ्यावर लावा. 

- जेव्हाही घराबाहेर पडाल चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून निघा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचं धुळ-मातपासून संरक्षण होईल. 

- काकडीच्या रसात काही थेंब लिंबाचा रस टाकून ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

(Image Credit : stylecraze.com)

- चेहऱ्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा आणि थोड्या वेळाने ते कोरडं झाल्यावर बेसनाच्या पीठाने ते स्वच्छ करा. 

- चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करण्यासाठी तांदळाच्या पीठात पुदीन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिश्रित करुन 10 मिनिटे लावून ठेवा. काही वेळाने पाण्याले चेहरा स्वच्छ करा. 

- सफरचंद आणि लिंबाचा रस सारख्या प्रमाणात मिश्रित करा आणि हा पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावा. यामुळे तुमचा चेहरा ग्लो करेल. 

(Image Credit : nawfalkanz.blogspot.com)

- रात्री झोपण्यापूर्वी आधी त्वचा स्वच्छ करा. याने चेहऱ्यावर पिंपल्स ब्लॅक हेड्स होणार नाहीत. 

- तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी तणावमुक्त रहायला हवं. त्यामुळे चेहऱ्यावर प्रभाव पडतो. 

- त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तेल-मसालेदार पदार्थ सेवन करु नका. 

- तेल ग्रंथी संतुलित करण्यासाठी फायबर युक्त पदार्थांचं सेवन करा. जेवणा सॅलडला सहभाग करा. 

- व्हिटॅमिन सी असलेल्या लिंबू, संत्रा आणि आवळा हे अधिक प्रमाणात खा. 

- टोमॅटो तेलकट त्वचेवर एस्ट्रिंजेटसारखं काम करतं. त्यामुळे टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. याने एक्स्ट्रा ऑईल बाहेर येईल. 

- आठवड्यातून एकदा घरगुती फेस मास्क लावा. चंदन पावडर, मुलतानी माती किंवा चिमुटभर हळद नारळाच्या पाण्यात मिश्रित करुन पेस्ट करा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेपऱ्यावर लावा. ते कोरडं झाल्यावर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.


Web Title: You must try these home remedies oily skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.