पुरूषांच्या केसगळतीचं एक नवं कारण आलं समोर, दुर्लक्ष करला तर बसाल बोंबलत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 10:30 AM2019-10-25T10:30:09+5:302019-10-25T10:35:12+5:30

हेअर लॉस म्हणजेच केसगळतीच्या समस्येने किती लोक हैराण आहेत हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. इतकेच काय आता तर केसगळतीने हैराण झालेल्या लोकांवर सिनेमा सुद्धा येऊ लागला आहे.

Working for more than 10 hours daily increases the risk of hair loss and baldness in men | पुरूषांच्या केसगळतीचं एक नवं कारण आलं समोर, दुर्लक्ष करला तर बसाल बोंबलत!

पुरूषांच्या केसगळतीचं एक नवं कारण आलं समोर, दुर्लक्ष करला तर बसाल बोंबलत!

Next

(Image Credit : simplemost.com)

हेअर लॉस म्हणजेच केसगळतीच्या समस्येने किती लोक हैराण आहेत हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. इतकेच काय आता तर केसगळतीने हैराण झालेल्या लोकांवर सिनेमा सुद्धा येऊ लागला आहे. केसगळती ही एक गंभीर समस्या असूनही लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत. नॅशनल हेल्थ सर्व्हे NHS नुसार, एका व्यक्तीने दररोज सरासरी ५० ते १०० केस गळतात. ज्यावर आपलं लक्ष जात नाही. केसगळतीला तुमची लाइफस्टाईल, स्ट्रेस आणि इतरही कारणे असू शकतात. पण आता एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, तुम्ही किती तास काम करता, याचाही प्रभाव तुमच्या केसांवर पडतो.

आठवड्यातून किती जास्त काम केल्याने केसगळती

(Image Credit : thesun.co.uk)

ऐनल्स ऑफ ऑक्यूपेशनल अ‍ॅन्ड इन्व्हार्नमेंटल मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, २० किंवा ३० वयात जे पुरूष एका आठवड्यात ५२ तासांपेक्षा जास्त काम करतात, त्यांचे केस अधिक गळतात. इतकेच नाही तर अधिक वेगाने गळतात. सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचं तर आठवड्यातून ५ वर्किंग डे नुसार जर तुम्ही तुम्ही प्रत्येक दिवशी १० तासपेक्षा जास्त काम करत असाल तर इतरांच्या तुलनेत तुमचे केस अधिक गळतील.

जास्त काम केल्याने हेअर फॉलिकल्सचं नुकसान

(Image Credit : uvhero.com)

रिसर्चमध्ये सहभागी सर्वच लोकांच्या लाइफस्टाईलमध्ये होणारे बदल आणि मॅरिटल स्टेटस लक्षात घेऊन काढलेले हे निष्कर्ष सर्वच सहभागी लोकांसाठी एकसारखेच होते. अभ्यासकांच्या टीमनुसार, फार जास्त काम केल्याने आणि शरीराला आराम न मिळाल्या कारणाने हेअर फॉलिकल्सचं नुकसान होतं. ज्यामुळे केस कॅटेजन फेसमध्ये पोहोचतात, जिथे केसांची अॅक्टिव ग्रोथ होणं बंद होतं.

१३,३९१ पुरूषांवर केला गेला रिसर्च

(Image Credit : healthline.com)

या रिसर्चमध्ये १३ हजार ३९१ नोकरी करणाऱ्या पुरूषांचा सहभाग करून घेण्यात आला होता आणि हा अशाप्रकारचा पहिलाच रिसर्च आहे ज्यात लॉंग वर्किंग आवर्सचा केसांसोबत काय संबंध आहे याबाबत सांगितलं गेलं. आठवड्यातून ४० तास काम करण्याला नॉर्मल कॅटेगरीत ठेवलं तर आठवड्यात ५२ तास काम करण्याला लॉंग वर्किंग आवर्समध्ये ठेवण्यात आलं. कामाचे जास्त तास आणि केसगळती यात थेट संबंद समोर आला आहे.


Web Title: Working for more than 10 hours daily increases the risk of hair loss and baldness in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.