वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्वचेच्या 'या' फायद्यांसाठीही प्या गरम पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 11:21 AM2019-09-28T11:21:19+5:302019-09-28T11:29:48+5:30

कोमट किंवा गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. वजन कमी करण्यासाठी रोज कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Want to improve face then drink hot water daily | वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्वचेच्या 'या' फायद्यांसाठीही प्या गरम पाणी!

वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्वचेच्या 'या' फायद्यांसाठीही प्या गरम पाणी!

Next

(Image Credit : kineticosa.com)

कोमट किंवा गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. वजन कमी करण्यासाठी रोज कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे गरम पाण्याने शरीरातील अतिरिक्त चरबी दूर होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच गरम पाणी प्यायल्याने केवळ मेटाबॉलिज्मच ठीक राहतं असं नाही तर त्वचेसाठीही गरम पाणी पिण्याचे वेगवेगळे फायदे होतात. चला जाणून घेऊन गरम पाणी पिण्याचे त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी होणारे फायदे...

(Image Credit : fitnesstipss.com)

रोज गरम पाण्याचं सेवन केल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. इतकेच नाही तर नियमित गरम पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार होते. गरम पाण्याचं सेवन केल्याने केवळ आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळते.

(Image Credit : womenyeah.com)

गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याचा परिणाम असा होतो की, आपली त्वचा आणखी चमकदार होते. तसेच त्वचेवरील मृत पेशीही दूर होण्यास मदत मिळते.

(Image Credit : mustelausa.com)

गरम पाणी प्यायल्याने शरीरात रक्तप्रवाह चांगल्याप्रकारे होऊ लागतो. तसेच गरम पाणी प्यायल्याने रक्तही शुद्ध राहतं. यामुळे चेहऱ्यावर डाग येत नाहीत. आणखी एक फायदा म्हणजे गरम पाणी प्यायल्याने त्वचेवर ओलावा कायम राहतो. त्यामुळे नियमित गरम पाणी सेवन केलं पाहिजे.

Web Title: Want to improve face then drink hot water daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.