घरी शेविंग करताना सर्वाधिक पुरूष करतात 'या' चुका, परफेक्ट शेविंगसाठी खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:13 PM2020-04-24T15:13:09+5:302020-04-24T15:14:20+5:30

घरी शेविंग करत असताना चुका केल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

Tips for perfect shaving at home myb | घरी शेविंग करताना सर्वाधिक पुरूष करतात 'या' चुका, परफेक्ट शेविंगसाठी खास टिप्स

घरी शेविंग करताना सर्वाधिक पुरूष करतात 'या' चुका, परफेक्ट शेविंगसाठी खास टिप्स

Next

लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता काहीही सुरू नाही. त्यातच सलून आणि पार्लर बंद असल्यामुळे घरोघरच्या पुरूषांची पंचाईत झाली आहे. लॉकडाऊनमुळे महिनाभरात सगळ्याच पुरुषांच्या केसांची आणि दाढीचा भरपूर वाढ झाली आहे. कधी एकदा जाऊन हेअर कट आणि  शेविंग करतोय असं झालंय, पण काहीजण घरीच शेविंग करत आहेत. घरी शेविंग करत असताना चुका केल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आम्ही तुम्हाला शेविंग करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत सांगणार आहोत. 

थंड पाण्याचा वापर करू नका

अंघोळ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. पण शेविंग करण्याासाठी थंड पाण्याचा वापर करू नका.कारण ठंड पाण्यामुळे रोमछिद्र आकुंचन पावतात. त्यामुळे शेविंग क्रिम व्यवस्थित लावली जात नाही. म्हणून चांगली शेव करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. 

मसाज न करणं

शेविंग करण्याआधी त्वचेची चांगली मसाज करायला हवी. त्यासाठी मॉईश्चराईजिंग क्रिमचा वापर करा. त्यामुळे त्वचेला पोषण मिळेल. त्वचा कोरडी न दिसता मऊ आणि मुलायम दिसेल.

योग्य दिशेने शेव करा

 

अनेकांना केसांच्या वाढीच्या उलट्या बाजूने शेविंग करण्याची सवय असते. त्यामुळे खाज खुजली किंवा इरिटेशन होण्याची शक्यता असते. त्यासाठी केस उगवण्याच्या दिशेने शेविंग करा. 

मॉईश्चराईजर न लावणं

Beauty: Daily shaving will cause harm, know! | Beauty : ​डेली शेविंग केल्यास होईल नुकसान, जाणून घ्या !

शेविंग केल्यानंतर  शेविंग जेल लावायची काहीजणांना सवय असते. या सवयी तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. कारण आफ्टर शेविंग जेलमध्ये अल्कोहोल असतं. त्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन पसरतं. त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी त्वचेवर मॉईश्चराईजर लावून मसाज करा.

ब्लेड लवकर न बदलणं

Beauty: Perfect Shaving Like Celebrity? These are special

अनेकदिवसांपर्यंत एकाच ब्लेडने शेविंग केल्यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं. कोणत्याही ब्लेडचा वापर ३ वेळापेक्षा जास्त करू नका. ब्लेडला गंज लागला असेल तर त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जर तुम्ही एकदाच वापरलं जाणारं रेजर वापरत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचं असावं. पण जर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच तेच रेजर वापरत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. तसंच दाढी कऱण्याआधी रेजर ५ मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवावं. याने रेजरवरील किटाणू नष्ट होतात आणि रेजरही दाढीवर सहजपणे काम करतं.

Web Title: Tips for perfect shaving at home myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.