थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 11:44 AM2020-01-01T11:44:57+5:302020-01-01T11:53:28+5:30

कधी कधी काही गोष्टींची काळजी तुमच्यासाठी समस्याही निर्माण करु शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या थंडीच्या दिवसात टाळायला पाहिजे. 

Take care of the skin in winter but don't make these mistakes! | थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका!

थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका!

Next

(Image Credit : athomediva.com)

थंडीचे दिवस आले की लोकांच्या सवयींमध्येही फरक बघायला मिळतो. थंडीत खासकरुन त्वचेची काळजी नेहमीपेक्षा जास्त घ्यावी लागते. पण लोक काळजी घेण्याच्या अशा काही गोष्टी करतात ज्याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं. कधी कधी काही गोष्टींची काळजी तुमच्यासाठी समस्याही निर्माण करु शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या थंडीच्या दिवसात टाळायला पाहिजे. 

पाय नेहमी झाकून ठेवणे - थंडीच्या दिवसात सर्वांनाच थंडी लागते. पण काही लोकांना थंडी जरा जास्तच जाणवते. हे लोक दिवस-रात्र हात आणि पाय झाकून ठेवतात. पण असे केल्याने त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशात हात आणि पाय सतत झाकून ठेवण्याऐवजी काही वेळासाठी मोकळे ठेवा.

पाणी कमी पिऊ नये - थंडीच्या दिवसात इतर ऋतुंच्या तुलनेत कमी तहाण लागते. पण याचा अर्थ हा नाही की, पाणी पिऊच नये. शरीराची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या तहाण नसली तरी या दिवसात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होणार नाही.

जास्त गरम पदार्थ खाणे - थंडीच्या दिवसात गरमीसाठी वेगवेगळे गरमागरम पदार्थ खाल्ले जातात. अनेकांना याची सवयही असते. काही लोक गरम पराठे, गोड पदार्थ खातात, पण सतत हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. सोबतच कोलेस्ट्रॉलचा स्तरही वाढतो, जे शरीरासाठी घातक ठरु शकतं. 

त्वचेवर नेहमी नेहमी क्रीम लावणे - थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याची समस्या अधिक प्रमाणात होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचेच आहे. पण काही लोक हे त्वचा मुलायम ठेवण्यासाठी त्वचेवर सतत चिकट क्रीम लावतात, याने त्वचेवर धुळ, माती आणि किटाणू चिकटतात. याने त्वचेचं अधिक नुकसान होऊ शकतं. 

काय वापरू नये

बेकिंग सोडा  - गरमीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसात बेकिंग सोडा वापरणे नुकसानदायक ठरु शकतं. याने त्वचेवर काळे डाग पडतात. याने तुमची त्वचा सावळी होऊ शकते.

लिंबू  - वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये लिंबाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. पण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असतं. याने त्वचा अधिक रखरखीत होऊ शकते.   

पुदीना - थंडीच्या दिवसात त्वचेवर पुदीना वापरल्यास याने डार्कनेस वाढते. कारण या मेंथोल अधिक प्रमाणात असतं. याने चेहऱ्याचा ओलावा शोषून घेतला जातो. 

वेगवेगळ्या सालींपासून फेस पॅक - वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये फळांच्या सालींपासून तयार केलेले फेस पॅक लावले जातात. पण थंडीच्या दिवसात याचा वापर करणे घातक ठरु शकतं. याने चेहऱ्याच्या त्वचेवरील तेल कमी होतं. याने त्वचेचा कोरडेपणा वाढू लागतो. 

संत्री - तसे तर थंडीच्या दिवसात संत्री खाणे फार फायदेशीर असतात. पण याच्या फेस पॅकचा वापर करणे समस्या निर्माण करु शकतो. कारण यात सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.


Web Title: Take care of the skin in winter but don't make these mistakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.