(Image Credit : india.com)

स्वच्छ, बेदाग, उजळलेली आणि चमकती त्वचा प्रत्येकालाच हवी असते. चेहऱ्यावर डाग असतील तर चेहरा लपवावा लागतो. हे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. तुम्हीही वेगवेगळे उपाय करून मोकळे झाले असाल आणि तरी सुद्धा त्वचेवरील डाग दूर झाले नसतील तर आम्ही तुमच्यासाठी एक खास घरगुती उपाय घेऊ आलो आहोत. वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवणाऱ्या लसणाचे त्वचेसाठीही अनेक फायदे होतात. ते काय हे जाणून घेऊ. सुरकुत्या, वाढत्या वयाची लक्षणे, ड्रायनेस यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. तुम्हालाही या त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर लसणाचा वापर करा.

लसूण आणि मध

लसूण आणि मध घ्या. लसणाच्या दोन कळ्यांची पेस्ट तयार करा. यात एक चमचा मध मिश्रित करा. मधाने चेहऱ्याचा ओलावा कायम राहतो. तसेच या पेस्टने चेहऱ्यावरील पिंपल्सही दूर होण्यास मदत मिळते. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेव आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. काही दिवसांमध्येच चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

लसण आणि हळद

तीन लसणाच्या कळ्या घेऊन पेस्ट तयार करा. यात एक चिमुट हळद टाका. हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा. १५ मिनिटांसाठी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. काही दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला फरक दिसू लागेल.

लसणासोबत अ‍ॅलोव्हेरा

अलोव्हेराचे त्वचेला होणारे फायदे तुम्हाला माहीत असतीलच. अ‍ॅलोव्हेरा एक नैसर्गिक मॉइश्चरायजर प्रमाणे काम करतं. लसणासोबत अ‍ॅलोव्हेराचं जेल मिश्रित करून चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होती. यासाठी लसणाच्या तीन कळ्यांची पेस्ट तयार करा. थोडं अ‍ॅलोव्हेरा जेल या पेस्टमध्ये टाका. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवावा. हे तीन उपाय कराल तर एका महिन्यात तुम्हाला त्वचेवरील डाग दूर झालेले दिसतील.Web Title: Skin care tips with garlic paste
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.