महिला आणि तरूणी आपली त्वचा आणि केसांची काळजी घेत असतात. आपलं सौंदर्य जपण्यासाठी मुली प्रत्येक महिन्यात कमीत कमी एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. यामध्ये त्या फेशिअल, फेस क्लीन-अप, हेअर स्पा, थ्रेडिंग, वॅक्सिंग, अप्पर लिप्स यांसारख्या ट्रिटमेंट्सचा समावेश असतो. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी क्लीन-अप आणि हातापायांसाठी वॅक्सिंग करतात. परंतु एवढचं करून हात-पाय सुंदर होत नाहीत. त्यासाठी मेनिक्योर, पेडिक्योर करणं गरजेचं असतं. 

जर तुम्ही त्या मुलींपैकी आहात, ज्या सर्व ट्रिटमेंट फॉलो करतात पण, पेडिक्योर न करून पैसे वाचवण्याचा विचार करतात. तर असं करणं सोडून द्या. कारण पेडिक्योर करण्याचे अनेक फायदे आहेत. पेडिक्योर फक्त हात आणि पाय सुंदर करत नाहीत, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. या फायद्यांबाबत तुम्हाला पार्लरमधील कोणतीही व्यक्ती सांगणार नाही. आज आम्ही तुम्हाला पेडिक्योरच्या अशाच 5 फायद्यांबाबत सांगणार आहोत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही पेडिक्योर करणं अजिबात टाळणार नाही... 

1. इन्फेक्शनपासून सुटका 

पेडिक्योर करताना नखं व्यवस्थित स्वच्छ केली जातात. स्किनच्या आतमध्ये वाढणारी नखंही कापण्यात येतात. त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. पेडिक्योर केल्याने नखांचं सौंदर्य आणखी वाढतं. 

2. नॅचरल ग्लो मिळतो

पेडिक्योर करताना स्क्रब, टोनर आणि जेलचा वापर करण्यात येतो. पेडिक्योरमध्ये वापरण्यात येणारे लोशन्स पायांच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी आणि स्वच्छ आणि चमकदार त्वचा होण्यासाठी मदत करतं. 

3. भेगाळलेल्या टाचा ठिक करतं

महिलांना नेहमी भेगाळलेल्या टांचांच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण ज्या महिला वेळीच पेडिक्योर करतात त्यांना अशा समस्येचा सामना करावा लागत नाही. पेडिक्योरमध्ये वापरण्यात येणारे प्रोडक्ट्स टाचांना भेगा पडू देत नाहीत. 

4. तणाव दूर करण्यासाठी 

पायांजवळ अनेक प्रकारच्या नसा असतात. ज्या थेट मेंदूपर्यंत पोहोचलेल्या असतात. पेडिक्योर करताना पायांची मालिश करण्यात येते. कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवल्याने पायांच्या नसांना आराम मिळतो. परिणामी मेंदूच्या नसांनाही आराम मिळतो. 

5. ब्लड सर्क्युलेशन वाढतं

हेल्दी राहण्यासाठी बॉडीच्या प्रत्येक भागामध्ये रक्ताचं उपयुक्त प्रवाह राहणं गरजेचं आहे. पेडिक्योर करताना पायांची मालिश करण्यात येते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्यामुळे स्किनवरील नॅचरल ग्लो वाढतो. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.


Web Title: Skin care tips 5 amazing benefits of pedicure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.