चमकदार आणि दाट केसांसाठी बटाट्याचा असा करा वापर, मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:50 PM2020-01-08T12:50:03+5:302020-01-08T12:59:31+5:30

बटाटा हा पदार्थ असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो.

Potato is usefull for shiny and thick hair | चमकदार आणि दाट केसांसाठी बटाट्याचा असा करा वापर, मग बघा कमाल

चमकदार आणि दाट केसांसाठी बटाट्याचा असा करा वापर, मग बघा कमाल

Next

बटाटा हा पदार्थ असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो. घरातही आणि बाहेरही खाद्यपदार्थात सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा. पण सध्याच्या काळात सगळे लोक इतके हेल्थ कॉन्शियस झाले आहेत.  बटाटा खाण्याचे टाळतात. तसंच बटाटा असलेले पदार्थ खाण्यासाठी विचार करतात . कारण काहीजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात तर काही जण पोटात गॅसची समस्या होऊ नये म्हणून बटाटा खात नाही. पण खाण्यासाठी बटाट्याचा वापर सोडता तुम्ही तुमच्या  केसांना सुंदर बनवण्यासाठी बटाट्याचा वापर करू शकतात.  कारण सध्याच्या काळात अनेक जणांना केस गळण्याची समस्या जाणवते.  जर तुम्ही  सुध्दा या समस्येने हैराण असाल तर बटाट्याच्या वापराने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसून येईल.

 केसांना सुंदर आणि काळेभोर  होण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरत असतो.  ज्या लोकांना केस गळण्याची समस्या जाणवते अशा लोकांनी जर बटाट्याचा वापर केला तर  फायद्याचं ठरेल. त्यामुळे केसांची वाढ चांगली होईल. बटाट्यात असलेले व्हिटामीन सी आणि आर्यन, व्हिटमीन बी केसांना बळकटी देण्यासाठी फायदेशीर ठरतात.  तसंच याचा वापर केसांवर केल्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थीत होऊन  केस गळणं बंद होतं. 

कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात.  कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्या ही दूर होईल.

मऊ आणि मुलायम केसांसाठी १ ते २  बटाटे किसून घ्या. यामध्ये मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा. ही पेस्ट केसांना लावा. हा हेअर पॅक सुकू द्यावा. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवावेत.  केस धुण्यासाठी जर तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तर  फायदेशीर ठरेल. 

केसांमध्ये कोंड्याचा त्रास दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हा पॅक केसांना मूळासकट लावा. २ तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवावेत. आठवडा भरात २-३ वेळा हा प्रयोग करा. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होईल. केस लांब वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा. हा पॅक केसांवर लावा. त्यानंतर पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे दीर्घकाळ केसांचं सौंदर्य टिकायला मदत होते. 

Web Title: Potato is usefull for shiny and thick hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.