(Image credit- skin beauty bar)

आजकाल बाजारात पहायला गेलं तर खूप सारे ब्रॅण्ड्स असतात जे सुंदर त्वचा मिळवून देण्याचा दावा करतात. पण या उत्पादनांवर खूप पैसे खर्च करून सुध्दा हवं तसं समाधान मिळतं नाही. तसंच  सध्या बिझी लाईफस्टाईलमध्ये  महिलांना सतत पार्लरला जायला जराही वेळ मिळत नाही. तुम्हाला सुध्दा अशा  स्थितीचा सामना करावा लागत असेल तर या घरगुती  वापरातल्या पदार्थांचा वापर केलात तर तुमची समस्या नक्की दूर  होईल. 

चण्याची डाळ हा घरगूती वापरातला महत्वाचा पदार्थ आहे. अनेक पध्दतीने चण्याच्या डाळीचा उपयोग केला जातो. जेवण बनवण्याव्यतिरीक्त सौंदर्य प्रसाधनांमध्ये चण्याच्या डाळीचा उपयोग केला जातो. त्याच डाळीच्या पिठाचा वापर करून त्वचेशी निडगीत समस्या आपण दूर करू शकतो. बेसन म्हणजेच चण्याच्या डाळीच्या पीठात प्रोटीन्स आणि कार्बोहाडड्रेट, फायबरर्स मोठ्या प्रमाणात आढळतात. शिवाय यामध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असते. 

कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त

 

बेसनाच्या पिठाचा वापर करून तुम्ही त्वचेला सुंदर बनवू शकता. यासाठी बेसनाच्या पिठात दूध आणि हळद घालून पेस्ट बनवून घ्या. ती पेस्ट चेहऱ्याला लावा. २० मिनीटांनंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग केल्यास त्वचा चमकदार दिसेल.

तेलकटपणा दूर होतो.

तेलकटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनामध्ये गुलाब जल घालुन पातळसर पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण त्वचेवर लावून वीस मिनिटं ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवून टाकावा. ह्या मिश्रणामुळे त्वचेतील पी एच लेव्हल संतुलित राहते. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते.

अ‍ॅक्नेची समस्या दूर 

 त्वचेतील तैलीय ग्रंथी जास्त सक्रीय झाल्याने चेहऱ्यावर, मुरुम येतात बेसनामध्ये असलेले झिंक अतिरिक्त तेल उत्पन्न होऊ देत नाही तसेच त्वचेवरील इन्फेक्शन कमी करते. ह्यासाठी एक मोठा चमचा बेसन घेऊन त्यामध्ये हळद घालावी. त्यामध्ये समप्रमाणात लिंबाचा रस आणि मधही घालावे. चेहरा ओलसर करून घेऊन त्यावर हे मिश्रण लावावे. दहा मिनिटे राहू देऊन चेहरा धुवून टाकावा. ज्यामुळे तुमचे हॉर्मोन्स संतुलित राहतात. त्वचेतील रक्ताभिरसण सुधारते.


चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी

चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्यासाठी बेसनाचा उपयोग केला जातो. बेसनात राईचे तेल घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. व्यवस्थीत एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावरील ज्या ठिकाणचे केस काढायचे आहेत त्या ठिकाणी लावा. हा प्रयोग केल्यास  चेहऱ्यावरील नको असलेले केस सोप्या पध्दतीने काढता येतील.


(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Know the uses of gram flour to skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.