तुम्ही हिल्सच्या चपला वापरत असाल तर असं पडेल महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:34 PM2020-01-12T15:34:09+5:302020-01-12T15:34:50+5:30

अनेक मुलींना हिल्सच्या सँण्डल घालायला फार आवडत असतं.

If you wear a high heels it may be a harmful for health | तुम्ही हिल्सच्या चपला वापरत असाल तर असं पडेल महागात...

तुम्ही हिल्सच्या चपला वापरत असाल तर असं पडेल महागात...

Next

अनेक मुलींना हिल्सच्या सँण्डल घालायला फार आवडत असतं. पण कधीतरी काही प्रसंग असेल तेव्हा तुम्ही हिल्सच्या चपला घातल्या तर काही प्रोब्लेम नाही. पण जर तुम्ही सुंदर आणि उंच दिसण्याच्या नादात  रोज हिल्सच्या चपला वापरत असाल तर ही गोष्ट तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. आज आम्ही तुम्हाला हाय हिल्सच्या सॅण्डल घातल्यानंतर  त्याचे साईडइफेक्टस काय असतात ते  सांगणार आहोत. 

दररोज हिल्सच्या चपला घातल्यामुळे तुमचा स्पाईनला त्रास होण्याची शक्यता असते. तसंच त्यामुळे गुडघ्यावर ताण येण्याची शक्यता असते. यांचा परिणाम वजनावर सुद्धा पडत असतो. तसंच पायदुखी तसंच सांधेदुखीचा त्रास होण्याची संभावना असते.  हिल्सच्या  वापरामुळे  तुमची उभं  राहण्याची पद्धत सुद्धा बदलू शकते. पायांच्या कोणत्याही मसल्सवर आवश्यकता  नसताना दबाव येत असतो. खास करून ज्या मुलीची  उंची कमी असते. त्या नेहमीच हिल्सच्या चपला वापरतात.

 जो फिल तुम्हाला आरामदायी चपला वापरून येतो. तसा कम्फरटनेस हिल्सच्या चपलांमध्ये येत नाही.  हिल्सच्या चपलांमुळे तुम्हाला कंबरदुखी, पाठदुखी, पायांना सुज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.  इतकेच नाही तर  पायांच्या बोटांवर दबाव येऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते.

Image result for high heels

त्यावेळी होत असलेल्या वेदना असह्य असतात. हाय हिल्स घातल्यामळे हायपर टेंशनची समस्या जाणवते. तसंच पाय दुखणे, थकवा येणे असा त्रास व्हायला सुरूवात होते.  हाय हिल्स घातल्यामुळे २६ टक्के ताण हा गुडघ्यावर येत असतो.  

Image result for high heels

हायहिल्समुळे पाय मुरगळण्याची शक्यता असते. कारण अनेक ठिकाणी रस्ते खडबडीत असतात.  त्यावेळी तोल जाऊन पायाला ईजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुमच्या पायाच्या नसा दुखायला सुरूवात होते. हाय हायहिल्सच्या अतिवापरामुळे लिगामेंट्सना दुखापत होण्याची सुद्धा होऊ शकते. त्यामुळे अशा चपलांचा वापर टाळल्यास पाय व्यवस्थित राहतील. 

Web Title: If you wear a high heels it may be a harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.