How to use sandalwood powder to get rid of dark circles with glowing skin | चंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका! 
चंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका! 

(Image Credit : www.nykaa.com)

त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडरचा वापर केला जातो हे तुम्हाला माहीत असेलच. पावसाळ्यात त्वचेची खास काळजी घेण्यासाठी चंदन पावडर अधिक फायदेशीर ठरतं. पावसाळ्यात ओलावा अधिक राहतो, सतत भिजल्याने त्वचेत फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका राहतो. अशात चंदन अ‍ॅंटीसेप्टिक बनून त्वचेची रक्षा करण्यास मदत करतं. चंदनाचा वापर ग्लोइंग स्किनसाठीही केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊन चंदन पावडरचा वापर....

चंदन पावडर वापरण्याची पद्धत

त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी चंदन पावडर वापरण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. यासाठी तुम्हाला चंदन पावडर, चंदन तेल, बेसन, हळद आणि गुलाबजलची गरज लागेल. या सर्वच गोष्टी समान प्रमाणात मिश्रित करा.

(Image Credit : www.womensok.com)

आता तयार झालेली पेस्ट हलक्या हाताने त्वचेवर लावा. संपूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर एकसमान पेस्ट लागली पाहिजे. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. याने तुम्हाला लवकरच फायदा बघायला मिळेल.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी चंदन पावडर

जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल असेल तर तुम्ही ही समस्या चंदन पावडरने दूर करू शकता. यासाठी चंदन पावडर, संत्र्याच्या सालीचं पावडर आणि गुलाबजल घ्या.

(Image Credit : english.newstracklive.com)

या तिन्ही वस्तू एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्या चांगल्याप्रकारे लावा. १० ते १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पेस्टचा वापर काही दिवस केल्याने डार्क सर्कल दूर होतील. त्यासोबतच या पेस्टचा नेहमी वापर केला जर चेहऱ्याची स्वच्छताही चांगली होऊ शकते.

English summary :
Want to know the benefits of chandan or dandalwood powder? or get rid from dark circles? then must read it. Also stay updated with us for more health tips in marathi at lokmat.com.


Web Title: How to use sandalwood powder to get rid of dark circles with glowing skin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.