मानेचा काळपटपणा दूर करून सौंदर्य खुलवण्यासाठी 'या' खास घरगुती टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:48 AM2019-08-30T11:48:18+5:302019-08-30T11:53:37+5:30

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपासून ते घरगुती उपायांपर्यंत सर्व उपाय करतो. यांमुळे सौंदर्यात भर पडते. पण यासर्व गडबडीमध्ये आपण आपल्या मानेकडे मात्र दुर्लक्षं करतो. त्यामुळे अनेकदा आपल्या सौंदर्यावरही परिणाम होतो.

How to improve beauty of neck skin | मानेचा काळपटपणा दूर करून सौंदर्य खुलवण्यासाठी 'या' खास घरगुती टिप्स

मानेचा काळपटपणा दूर करून सौंदर्य खुलवण्यासाठी 'या' खास घरगुती टिप्स

Next

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपासून ते घरगुती उपायांपर्यंत सर्व उपाय करतो. यांमुळे सौंदर्यात भर पडते. पण यासर्व गडबडीमध्ये आपण आपल्या मानेकडे मात्र दुर्लक्षं करतो. त्यामुळे अनेकदा आपल्या सौंदर्यावरही परिणाम होतो. याच कारणामुळे ब्युटि एक्सपर्ट्स नेहमी यागोष्टीर जोर देतात की, मानेच्या त्वचेचीही काळजी घेणं गरजेचं असतं. जेवढं आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो. 

असं वाढवा मानेचं सौंदर्य... 

मानेचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला काही अशाच पद्धतींबाबत सांगणार आहोत.


 
मसाज

चेहऱ्याचा मसाज करण्याएवढचं मानेचा मसाज करणंही गरजेचं आहे. कारण मानेची त्वचा फार नाजूक असते. त्यामुळे मसाज दरम्यान प्रेशर आणि मूव्हमेंटवर खास लक्षं देण्याची गरज असते. मानेला मसाज करताना हॅन्ड मूव्हमेंट्स खालील बाजूने वरच्या दिशेने ठेवा. सर्वात आधी साइड नेक पार्टवर आणि त्यांनतर फ्रंट अॅन्ड बॅक पोर्शनवर मसाज करा. लक्षात ठेवा की, मानेला 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त मसाज करू नका. 

ऑइल 

मानेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल, बदामाचं तेल किंवा रोज ऑइलचा वापर करा. यामुळे मानेच्या त्वचेचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. हातावर तेल घेऊन मानेवर मसाज करा. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी आंघोळ करताना व्यवस्थित स्वच्छ करा. 

मास्क 

चेहऱ्यासोबत मानेसाठीही तुम्ही स्पेशल मास्क तयार करू शकता. तोही पूर्णपणे नॅचरली. त्यासाठी एक केळं स्मॅश करून घ्या आणि त्यामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. तयार पॅख मानेवर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा आणि ओल्या नॅपकिनच्या मदतीने मान स्वच्छ करून घ्या. मानेसाठी अंड्याचा पॅकही अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी अंड्याचा पांडरा भाग वेगळा करून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करा. तयार पॅक 10 ते 15 मिनिटांसाठी तसाच ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. 

मानेची स्वच्छता राखा... 

मानेची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक असतं. तसेच दररोज आंघोळ करताना साबणाच्या मदतीने मान स्वच्छ करणंही आवश्यक आहे. यादरम्यान सर्क्युलर मोशनमध्ये मान स्वच्छ करा. पाण्याने धुतल्यानंतर मॉयश्चरायझर नक्की लावा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: How to improve beauty of neck skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.