त्वचेवर ग्लो हवा असेल तर थंड दुधाचा 'असा' करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:51 PM2020-02-10T12:51:47+5:302020-02-10T14:54:57+5:30

दुधाचे सेवन करण्याचे शरीराला होणारे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहीत असतात.  

How to get glowing skin by using cold milk | त्वचेवर ग्लो हवा असेल तर थंड दुधाचा 'असा' करा वापर

त्वचेवर ग्लो हवा असेल तर थंड दुधाचा 'असा' करा वापर

Next

दुधाचे सेवन करण्याचे शरीराला होणारे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहीत असतात.  लहानपणापासूनच आपल्याला दुधापासून आरोग्याला होणारे फायदे सांगितले जातात. आज आम्ही तुम्हाला थंड दुधाच्या सेवनाचे शरीराला आणि त्वचेला होत असलेल्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. थंड दूध प्यायल्याने त्वचा आणि शरीराला अनेक फायदे मिळत असतात.  दुधाचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनात केला जातो. पण घरच्याघरी सुद्धा थंड दुधाचा वापर करून तुम्ही आपली त्वचा सुंदर बनवू शकता. 

पोटाच्या समस्यांपासून सुटका

जेव्हा तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवत असतात. त्यावेळी एक ग्लास थंड दूध प्या. त्यामुळे एसिडीटी आणि गॅस तसंच अपचनाच्या समस्येपासून आराम मिळेल.  दुधातील लॅक्टीक एसिड पोटात असलेल्या एसिडिटीला कमी करते. कॅल्शियम आणि एक्सट्रा एसिड्सना  थांबवण्याचे काम थंड दुधाच्या सेवनाने होत असते. त्यामुळे जर तुम्हाला एसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करा.

ज्या लोकांना पोट साफ होण्यास त्रास होत असतो. अशा लोकांना अपचनाचा त्रास खूप जाणवतो. अशी समस्या जाणवल्यास थंड दुधाचा वापर करायला हवा. यामुळे फुड पाईपमध्ये असलेला चिकटपणा निघून जाण्यास मदत होते. 

त्वचेसाठी फायदेशीर

स्किन पोर्सच्या दुरूस्तीसाठी एक नॅचरल क्लिंजरप्रमाणे थंड दूध काम करत असतं.  त्यामुळे त्वचेवरील पोर्समध्ये असलेली घाण निघून जाते. दूधात असलेले नॅचरल फॅट्स त्वचेला पोषण देत असतात. दुधाची साय चेहऱ्यावरील लाल डाग घालवण्यासाठी फायद्याची असते. दुधाची साय डाग पडलेल्या जागी लावून ती सुकू द्यावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्यास लाल डाग कमी करण्यास मदत होते.  थंड दुधाची साय लावलेला चेहऱ्यावरील भागाचा तजेलदारपणाही वाढतो.

तुमच्या त्वचेवर असलेले डाग, मुरुम घालवून तुम्हाला सुंदर, कोमल  त्वचा हवी असेल तर  थंड दुधाची साय तुम्ही चेहऱ्याला लावू शकता त्यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही. त्वचेवर तुम्ही रोज सकाळी दुधाची साय नुसती लावली तरीही तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. ( हे पण वाचा-साबणाची वडी की लिक्विड सोप? त्वचेसाठी काय असतं अधिक फायदेशीर)

टांचा पडलेल्या भेगा दूर होतात

दुधात  त्वचेला मॉईश्चराईज करण्यासाठी आवश्यक असलेले घटक असतात. म्हणून  कोरडया  आणि फाटलेल्या टाचांना  मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी  दूध खूपच फायदेशीर ठरत असतं.  दुधातील लॅक्टीक एसिड त्वचेतील मृत पेशींना काढून टाकून नवीन सेल्स निर्माण करण्यासाठी फायदेशीर असतात. ( हे पण वाचा-ओठाच्या आजूबाजूच्या मंकी पॅचेसमुळे चेहरा खराब दिसतो? घरच्याघरी 'या' उपायांनी मंकी पॅचेस होतील दूर)

Web Title: How to get glowing skin by using cold milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.