फक्त २ रूपयांच्या तुरटीने मिळवा काळेभोर केस, पांढऱ्या केसांची कटकट होईल दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:47 AM2020-03-04T11:47:43+5:302020-03-04T11:54:44+5:30

तुरटीच्या वापराने केसांच्या समस्या कधी होतील दूर कळणार सुद्धा नाही.

How get black hairs by using crystals myb | फक्त २ रूपयांच्या तुरटीने मिळवा काळेभोर केस, पांढऱ्या केसांची कटकट होईल दूर...

फक्त २ रूपयांच्या तुरटीने मिळवा काळेभोर केस, पांढऱ्या केसांची कटकट होईल दूर...

googlenewsNext

आपल्या सगळ्यांच्या घरात तुरटी असते. साफसफाई करण्यासाठी किंवा घरातील इतर कामांसाठी तुरटीचा वापर महत्वपूर्ण समजला जातो.  साधारणपणे घरात दाढी करणारे पुरूष शेविंग नंतर त्वचेला नीट ठेवण्यासाठी किंवा रक्त येण्यापासून थांबवण्यासाठी  तुरटीचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का पांढरे केस असल्याच्या समस्येचा सामना तुम्हाला करावा लागत  असेल, तर तुम्ही  फक्त २ रूपयांना मिळत असलेल्या तुरटीचा वापर करून सुद्धा पांढरे केस काळे करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा तुरटीचा वापर.

महिलांनांच नाही तर मोठ्या प्रमाणावर पुरूषांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो.  दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या चुकांमुळे या केस पांढरे होण्याचा सामना करावा लागतो. तुरटीचा केसांवर वापर करण्यासाठी तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारिक करून घ्या.  आणि त्यात 1 चमचा गुलाबपाणी घाला. त्यानंतर  ५ मिनिटांपर्यंत केसांवर मसाज करा. मग १ तासानी केसांना शॅम्पूने धुवून टाका.  आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग केल्यास पांढरे केस असण्याची समस्या कमी होत जाईल. 

केस धुताना कोमट पाण्यात दळलेली तुरटी आणि कंडीशनर घाला. त्यासोबत मिक्स करा.  हे मिश्रण  केसांना खालपर्यंत लावा.  त्यानंतर  १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा  हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-कोपर काळे झाले म्हणून हात झाकावा लागतोय? 'हे' उपाय करून काळपटपणा कायमचा होईल दूर)

जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुरटी हा बेस्ट ऑप्शन आहे.  त्यासाठी तुरटी बारिक करून  पाण्यात मिसळून पेस्ट तयार  करून घ्या. नंतर वीस मिनिटांनी चेहरा धूवुन टाका.  जर तुमच्या चेहरा आणि मानेवर सुरकुत्या आल्या असतील तर  त्वचा टाईट करण्यासाठी  तुरटीचा वापर हा बेस्ट पर्याय आहे. त्यासाठी गुलाब पाण्याचा वापर तुरटीसह करावा.  (हे पण वाचा-चेहरा गोरा आणि मान काळी वाटत असेल तर मानेचं टॅनिंग घालवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक)

Web Title: How get black hairs by using crystals myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.