सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:29 AM2019-08-16T11:29:04+5:302019-08-16T11:29:25+5:30

पिंपल्सपासून लगेच सुटका मिळवायची असेल तर वापरा या सोप्या टिप्स.

Easy remedies to get rid of pimples | सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स!

सततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स!

Next

(Image Credit : www.hellomagazine.com)

पिंपल्स ही तारूण्यात होणारी सामान्य समस्या आहे. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे आणि त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्याने पिंपल्स कोणत्याही वयात येतात. पिंपल्सने केवळ त्वचा खराब होते असे नाही तर तुमच्या सौंदर्यालाही गालबोट लागतं. पिंपल्स लपवण्यासाठी नको नको त्या गोष्टी कराव्या लागतात. काही लोकांना वाटतं की, पिंपल्स आपोआप काही दिवसांनी दूर होतात. पण पिंपल्सवर वेळीच उपाय केले नाही तर त्याचे डागही चेहऱ्यावर पडू शकतात. 

(Image Credit : www.healthline.com)

पिंपल्स दूर करण्यासाठी बाजारात वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. पण यातही केमिकलचा वापर केला असल्याने त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. अशात काही खास उपायांनी पिंपल्स दूर करणे अधिक फायद्याचं ठरेल. असेच काही उपाय खालीलप्रमाणे सांगता येतील.

त्वचेची स्वच्छता

(Image Credit : www.quora.com)

जेव्हा पिंपल्स होतात तेव्हा त्वचेच्या रोमछिद्रांची चांगली स्वच्छता होत नाही. रोमछिद्रे स्वच्छ करण्यासाठी चांगल्या क्लींजरचा वापर करा. त्वचेवर प्रदूषणामुळे धूळ किंवा माती चिकटून राहते. त्यामुळे त्वचेच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते.

पिंपल्स क्रिम किंवा अ‍ॅंटी-अ‍ॅंक्ने क्रिम

(Image Credit : khoobsurati.com)

जर पिंपल्सचा आकार फार मोठा असेल आणि ते लाल रंगाचे असतील तर वेळीच उपाय महत्त्वाचा ठरतो. अशात बाजारात मिळणारी चांगली अ‍ॅंटी-अ‍ॅंक्ने क्रिम वापरावी. या क्रिमची निवड तुमच्या स्किन टाइपनुसारच हवी. जर ही क्रिम तुमच्या त्वचेला सूट करत नसेल तर वापर करू नये.

पिंपल्ससाठी एस्प्रिन गोळी

(Image Credit : youtube.com)

हा एकप्रकारे घरगुती उपायच आहे. कारण असं करण्याचा सल्ला स्किन केअर एक्सपर्ट्स देत नाहीत. पण ब्युटी केअर एक्सपर्ट्स याचा सल्ला देतात. चेहऱ्यावर फार जास्त पिंपल्स आले असतील तर एस्प्रिनची टॅबलेट बारिक करून पिंपल्सवर लावा. याने फायदा होईल. पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइल

त्वचेची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचाही तुम्ही वापर करू शकता. खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइलचा एकत्र वापरही अधिक फायदेशीर ठरू शकतो. यासाठी खोबऱ्याचं तेल आणि टी ट्री ऑइल समान प्रमाणात एकत्र करा. कॉटनच्या मदतीने हे तेल रात्रभर पिंपल्सवर लावून ठेवा. दोन ते तीन आठवड्यात तुम्हाला पिंपल्सपासून सुटका मिळेल.

Web Title: Easy remedies to get rid of pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.