(Image Credit : The Independent)

पावसाळ्यात केसांचं आरोग्य वेगवेगळ्या कारणांनी धोक्यात येतं. पण ही झाले बाहेरील आणि वातावरणाच्या बदलाची कारणे. पण केसांचं आरोग्य अडचणीत येण्यासाठी आपल्या काही सवयी सुद्धा तेवढ्याच कारणीभूत असतात. अनेकदा केसांची काळजी घेण्याकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळेही केस डॅमेज होतात. चला जाणून घेऊ केस डॅमेज होण्याची काही मुख्य कारणे...

जास्त गरम पाण्याने आंघोळ

(Image Credit : FashionLady)

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात लोक आंघोळीसाठी फार जास्त गरम पाण्याचा वापर करतात. याने केस डॅमेज होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.  गरम पाण्यामुळे केसांचे क्टूटिकल्स मोकळे होतात, यामुळे कंडीशनर आणि शॅम्पू त्यांचं काम योग्यप्रकारे करू शकतात. याचप्रमाणे थंड पाण्याने आंघोळ केल्याने केसांचे क्यूटिकल्स बंद होतात. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही. म्हणजे काय तर केसांची योग्य काळजी घ्यायची असेल तर फार जास्त गरम पाणी आणि फार जास्त थंड पाणी वापरू नये.

जास्त शॅम्पू वापरणे

(Image Credit : BT.com)

केस धुण्यासाठी शॅम्पूची गरज असतेच.  पण एका आठवड्यात तीनपेक्षा जास्त वेळ शॅम्पूचा वापर केल्याने केस डॅमेज होऊ शकतात. शॅम्पू केसांच्या मुळात लावा आणि कंडीशनरचा वापर केसांच्या लांबीनुसार करावा. असं केल्याने तुमच्या केसांचा रखरखीतपणा दूर होईल आणि केस चमकदार होतील.

केस घासून घासून धुणे

(Image Credit : Boldsky.com)

अनेकदा महिला केस फार जोरजोरात घासून घासून धुतात. असं अजिबात करू नये. केस नेहमी हळुवारपणे, प्रेमाने धुतले पाहिजे. केस धुताना हात नेहमी राउंड शेपमध्ये फिरवू नये. याने केस अधिक गुंततात.

पुन्हा पुन्हा शॅम्पू बदलणे

(Image Credit : Mother Nature Network)

जर तुम्हीही वेगवेगळ्या जाहिराती बघून नवनवीन शम्पू ट्राय करत असाल तर हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. पुन्हा पुन्हा शॅम्पू बदलल्याने केस डॅमेज होतात. तसेच शॅम्पू केल्यानंतर कंडीशनर वापरल्याने केस चमकदार आि सिल्की होतात. 


Web Title: Damage hair those mistakes that make your hair bad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.