पिंपल्स ठरतायत डोकेदुखी?; 'हा' फेसपॅक ठरेल रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:45 PM2019-10-28T12:45:00+5:302019-10-28T12:49:19+5:30

बदलणाऱ्या वातावरणात सर्वात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे, चेहऱ्यावरील पिंपल्सची. दरम्यान काही लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह असते.

Cinnamon honey packs for get rid of pimples | पिंपल्स ठरतायत डोकेदुखी?; 'हा' फेसपॅक ठरेल रामबाण उपाय

पिंपल्स ठरतायत डोकेदुखी?; 'हा' फेसपॅक ठरेल रामबाण उपाय

Next

(Image Credit : Medical News Today)

बदलणाऱ्या वातावरणात सर्वात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे, चेहऱ्यावरील पिंपल्सची. दरम्यान काही लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह असते. ज्यामुळे ऊन आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा यामुले जळजळ होते आणि लाल चट्टेही येतात. अशातच आज आम्ही तुम्हाला एक होममेड पॅकबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे पिंपल्स दूर करण्यासाठी मदत मिळेल. एवढचं नाहीतर पिंपल्समुळे आलेले डागही दूर होतील. 

जाणून घेऊया फेसपॅक तयार करण्याची पद्धत... 

साहित्य : 

दालचिनी पावडर - एक चमचा 
मध- एक चमचा 

तयार करण्याची पद्धत : 

- दोन्ही गोष्टी एकत्र करून चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 30 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून तसचं ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लो वाढतो. 

याव्यतिरिक्त दिवसभरात एकदा बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करा. जर तुम्हाला त्वचेवर रेडनेस जाणवत असेल तर पक्त 5 ते 10 मिनिटांसाठी मसाज करा. त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होइल. 

का फायदेशीर ठरतो हा फेसपॅक? 

अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि इन्फ्लेमेंट्री गुणधर्म असलेली दालचिनी आणि मध पिंपल्स दूर करण्याचं काम करतात. हे त्वचेच्या आतमधील बॅक्टेरिया दूर करतातं. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Cinnamon honey packs for get rid of pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.