एकही पैसा खर्च न करता घरीच तयार करा जेल आयलाइनर अन् काजळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 02:16 PM2019-10-22T14:16:34+5:302019-10-22T14:20:35+5:30

बाजारात अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. ज्यांचा तुमच्या दररोजच्या लाइफमध्ये नेहमी समावेश होतो. अनेक प्रकारच्या कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्ट बाजारामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतात.

Beauty tips how to make gel eyeliner or kajal at home follow these simple tips | एकही पैसा खर्च न करता घरीच तयार करा जेल आयलाइनर अन् काजळ

एकही पैसा खर्च न करता घरीच तयार करा जेल आयलाइनर अन् काजळ

Next

बाजारात अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. ज्यांचा तुमच्या दररोजच्या लाइफमध्ये नेहमी समावेश होतो. अनेक प्रकारच्या कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्ट बाजारामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतात. परंतु, हे प्रोडक्ट्स प्रत्येकाच्या त्वचेसाठी फायदेशीर असतीलच असं नाही. अनेकदा असं होतं की, बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये केमिकल्सचा समावेश करण्यात आलेला असतो. ते प्रत्येकाच्या त्वचेसाठी फायदेशीर असतीलच असं नाही. 

तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्य पद्धतीने तुमच्या आवडीचे ब्युटी प्रोडक्ट्स तयार करू शकता. आम्ही तुम्हाला घरच्या घरी आयलाइनर तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत. डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक महिला आणि तरूणी आयलाइनरचा वापर करतात. 

प्रत्येक मुलीला लिक्विड आयलाइनर, पेन्सिल आयलाइनर, जेल आइलाइनरचा वापर करत असतात. अशातच जर तुम्हाला बाजारात मिलणाऱ्या प्रोडक्ट्मुळे अ‍ॅलर्जी किंवा रॅशेज सारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर सिम्पल जेल आयलाइनरच नाही तर इतर कलरफुल जेल आयलाइनरही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. 

घरच्या घरी जेल आयलाइनर तयार करण्यासाठी तुम्हाला ब्लॅक किंवा कोणत्याही एका रंगाचा आयशॅडो, एक छोटं कंटेनर, आय प्रायमर किंवा खोबऱ्याचं तेल आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर आयलाइनर तयार करण्यासाठी ब्लॅक आयशॅडोचा वापर करा. परंतु, जर तुम्हाला कलरफुल आयलाइनर तयार करायचं असेल तर त्या कलरच्या आयशॅडोचा वापर करू शकता. या सर्व गोष्टींचा वापर करून एक उत्तम आयलाइनर तयार केलं जाऊ शकतं. 

जेल आइलाइनरसाठी कोणत्या गोष्टींची गरज असते... 

1. कोणत्याही रंगाचं आयशॅडो 
2. डोळ्यांसाठी प्रायमर
3. खोबऱ्याचं तेल 
4. एक क्यू टिप 

कसं तयार कराल जेल आयलाइनर : 

1. एक काळ्या रंगाचं आयलाइनर घ्या आणि कमी प्रमाणात एका छोट्या कंटेनरमध्ये ठेवा. 
2. कंटेनरमध्ये डोळ्यांचं प्रायमर घ्या आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. 
3. तयार मिश्रणात खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब एकत्र करा. 
4. त्यानंतर एका क्यू की नोकचा वापर करून सर्व साहित्य एकत्र करा. 
5. अजिबात पैसा खर्च न करता जेल आयलाइनर तयार आहे. 

होतात हे फायदे : 

घरच्या घरी अगदी सोप्य पद्धतींनी तुम्ही वेगवेगळ्या कलर्सचे आयलाइनरतयार करू शकता. जे बाजारामध्ये सहज मिळत नाहीत. याव्यतिरिक्त हे जेल आयलाइनर अत्यंत स्मूद लूक देतं. ज्यामुळे डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत होते. घरी तयार करण्यात आलेले हे आयलाइनर आरामात 7 ते 8 तास टिकतं. 

या गोष्टी ठेवा लक्षात : 

1. जेल आयलाइनर तयार करण्यासाठी थोडं लूज आयशॅडोचा वापर करा. 
2. एका अशा प्राइमरचा वापर करा जे स्वच्छ आहे. 
3. खोबऱ्याच्या तेलाऐवजी तुम्ही वॅसलिनचाही वापर करू शकता. 
4. आयलाइनर तयार करण्यासाठी एक मॅट आयशॅडोचा वापर करा. जेणेकरून यामध्ये शिमरी इफेक्ट कमी होतील. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Beauty tips how to make gel eyeliner or kajal at home follow these simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.