World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 10:36 AM2018-08-01T10:36:02+5:302018-08-01T10:36:25+5:30

भारताचा प्रमुख खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

World Badminton Championships 2018: Kidambi Srikanth entered in pre-quarterfinals | World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

Next

नानजिंग (चीन) : भारताचा प्रमुख खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने बुधवारी झालेल्या लढतीत स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनचे आव्हान 21-15, 12-21, 21-14 असे मोडून काढले. पुढील फेरीत त्याला मलेशियाच्या डॅरेन लिएवचा सामना करावा लागणार आहे. 



श्रीकांतने पहिला गेम 21-15 असा सहज जिंकला, परंतु स्पेनच्या खेळाडूने दुस-या गेममध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने 6-6 अशा बरोबरीनंतर खेळातील दर्जा उंचावताना 21-12 अशा विजयासह ही लढत 1-1 अशा बरोबरीत आणली. मात्र, श्रीकांतने तिस-या व निर्णायक गेममध्ये दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा खेळ करताना 21-14 असा विजय मिळवला. 


श्रीकांतला पुढील सामन्यात मलेशियाच्या डॅरनेचा सामना करावा लागेल. डॅरेनने इस्राईलच्या मिशा झिल्बेर्मनचा 12-21, 21-17, 21-10 असा पराभव केला आहे. 

Web Title: World Badminton Championships 2018: Kidambi Srikanth entered in pre-quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.