व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन :सौरभ वर्माला अजिंक्यपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 04:26 AM2019-09-16T04:26:52+5:302019-09-16T04:27:04+5:30

व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या सून फेई शियांगचा पराभव करीत जेतेपद पटकाविले.

Vietnam Open Badminton: Saurabh Verma unbeaten | व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन :सौरभ वर्माला अजिंक्यपद

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन :सौरभ वर्माला अजिंक्यपद

Next

हो ची मिन्ह सिटी : भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रविवारी येथे व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या सून फेई शियांगचा पराभव करीत जेतेपद पटकाविले. दुसऱ्या मानांकित सौरभने ७५ हजार डॉलर पुरस्कार रक्कम असलेल्या स्पर्धेत एक तास १२ मिनिट रंगलेल्या अंतिम लढतीत २१-१२, १७-२१, २१-१४ ने सरशी साधली. सौरभने जेतेपद पटकाविण्याच्या प्रवासात जपानचा कोदाई नारोका, यू इगाराशी व मिनोरू कोगा यांचा पराभव केला.
विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन सौरभने यंदा हैदराबाद ओपन व स्लोव्हेनियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही जेतेपद पटकाविले आहे.
सौरभने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून वर्चस्व गाजविताना ४-० अशी आघाडी घेतली. ब्रेकच्या वेळी तो ११-४ने आघाडीवर होता. ब्रेकनंतरही त्याने लय कायम राखत १५-४ असा स्कोअर केला. सूनने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सौरभने पहिला गेम सहज जिंकला.
दुसºया गेममध्ये सूनने शानदार खेळ केला आणि सुरुवातीलाच ८-० अशी आघाडी घेतली. ब्रेकच्या वेळी तो ११-५ ने आघाडीवर होता. ब्रेकनंतर सौरभ संघर्ष करीत असल्याचे दिसले. त्याचा लाभ घेत सूनने गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेमच्या सुुरुवातीला २६ वर्षीय सौरभ २-४ ने पिछाडीवर होता; पण ब्रेकपर्यंत त्याने ११-७ अशी आघाडी घेतली होती. चीनच्या खेळाडूने त्याला आव्हान दिले;
पण भारतीय खेळाडूने आपली
आघाडी कायम राखली. १७-१४
अशी आघाडी असताना सौरभने
सलग चार गुण वसूल करीत
चीनच्या खेळाडूचे मनसुबे उधळून लावले. मध्य प्रदेशच्या या
खेळाडूने गेल्या वर्षी डच ओपन व कोरिया ओपनमध्येही जेतेपद पटकाविले होते.
सौरभ व सून यांच्यादरम्यान ही तिसरी लढत होती. सौरभने यापूर्वी कॅनडा व हैदराबादमध्ये जपानच्या या खेळाडूचा पराभव केला होता.
जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेला सौरभ म्हणाला, ‘पहिल्या गेममध्ये मी त्याच्या कमकुवत रिटर्नची प्रतीक्षा करीत होतो. मला त्याचा बचाव कमकुवत वाटला व त्याचा लाभ घेतला.’
>या आठवड्यातील माझ्या खेळावर समाधानी आहे. मी जपानच्या तीन खेळाडूंविरुद्ध विजय मिळविला. या खेळाडूंची खेळण्याची शैली जवळपास सारखी होती. कोर्टवर त्यांच्या खेळण्यात जो थोडा फरक होता त्यावर लक्ष द्यायचे होते. त्यांना पराभूत करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.
- सौरभ वर्मा

Web Title: Vietnam Open Badminton: Saurabh Verma unbeaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.