लक्ष्यचा स्कॉटिश ओपनमध्ये दबदबा, यंदाच्या मोसमातील चौथे अजिंक्यपद पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:57 AM2019-11-26T04:57:30+5:302019-11-26T04:58:05+5:30

भारतीय बॅडमिंटनमधील उदयोन्मुख स्टार लक्ष्य सेनने येथे स्कॉटिश ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये ब्राझीलच्या यगोर कोएल्होविरुद्ध रोमांचक विजय मिळवत तीन महिन्यांत चौथे जेतेपद पटकावले.

lakshya dominated at Scottish Open, winning fourth title this season | लक्ष्यचा स्कॉटिश ओपनमध्ये दबदबा, यंदाच्या मोसमातील चौथे अजिंक्यपद पटकावले

लक्ष्यचा स्कॉटिश ओपनमध्ये दबदबा, यंदाच्या मोसमातील चौथे अजिंक्यपद पटकावले

Next

ग्लास्गो : भारतीय बॅडमिंटनमधील उदयोन्मुख स्टार लक्ष्य सेनने येथे स्कॉटिश ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये ब्राझीलच्या यगोर कोएल्होविरुद्ध रोमांचक विजय मिळवत तीन महिन्यांत चौथे जेतेपद पटकावले. अव्वल मानांकित लक्ष्यने रविवारी रात्री झालेल्या अंतिम लढतीत ब्राझीलच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ५६ मिनिटांमध्ये १८-२१, २१-१८, २१-१९ ने विजय मिळवला.

उत्तराखंडच्या १८ वर्षीय लक्ष्यचे गेल्या चार स्पर्धांमधील हे तिसरे विजेतेपद आहे. त्याने यापूर्वी सारलोरलक्स ओपन, डच ओपन आणि बेल्जियम इंटरनॅशनलमध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता. आयरिश ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लक्ष्यने येथे शानदार पुनरागमन केले. भारतीय खेळाडूने आपल्या मोहिमेची सुरुवात आॅस्ट्रियाच्या लुका व्रेबरविरुद्ध सरळ गेम्समध्ये विजय मिळवत केली. त्यानंतर मायदेशातील सहकारी किरण जॉर्जचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत ४१ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने सहाव्या मानांकित ब्रायन यंगचा थेट दोन गेममध्ये पराभव केला आणि त्यानंतर उपांत्य फेरीत फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोवविरुद्ध सरशी साधली. या विजेतेपदासह लक्ष्य बीडब्ल्यूएफ मानांकनामध्ये अव्वल ४० मध्ये स्थान निश्चित करणार असून ग्रेड दोनच्या अव्वल स्पर्धांमध्ये थेट प्रवेशासाठी पात्रता मिळवण्याच्या समीप
राहील. (वृत्तसंस्था)

1लक्ष्यपूर्वी आनंद पवार (२०१० व २०१२), अरविंद भट (२००४) आणि पुलेल्ला गोपीचंद (१९९९) यांनी स्कॉटिश ओपनमध्ये जेतेपद पटकावले आहे. लक्ष्यने लढतीत संथ सुरुवात केली, पण त्यानंतर १०-८ अशी आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला.
2कोएल्होने सलग सहा गुण वसूल करीत १४-१० अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर त्याने पहिला गेम जिंकला. लक्ष्यने दुसºया गेममध्ये शानदार पुनरागमन करताना ७-० अशी आघाडी घेतली, पण ब्राझीलच्या खेळाडूने १७-१७ अशी बरोबरी साधली. भारतीय खेळाडूने पुढील पाचपैकी चार गुण वसूल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
3तिसºया व निर्णायक गेममध्ये चुरशीची लढत झाली. ब्रेकदरम्यान कोएल्हो ११-८ ने आघाडीवर होता, पण लक्ष्यने बरोबरी साधल्यानंतर गेम व सामना जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: lakshya dominated at Scottish Open, winning fourth title this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton