देशातील सर्वाधिक खपाची कॉम्पॅक्ट SUV कोणती? Maruti Brezza चा नंबर कितवा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 04:21 PM2020-12-17T16:21:07+5:302020-12-17T16:22:27+5:30

Compact SUV Market Growing: जर तुम्हाला कॉम्पॅक्ट एसयुव्ही घ्यायचे वाटत असेल तर हा डेटा खूप महत्वाचा आहे. सध्या देशातील देशातील सर्वाधिक खपाची कॉम्पॅक्ट SUV कोणती? असा प्रश्न पडला असेल...अफकोर्स मारुतीची Maruti Suzuki Vitara Brezza नाही का? उत्तर आहे नाही

Which is the most selling compact SUV? Kia Sonet, Maruti Brezza, Hyundai Venue, tata Nexon | देशातील सर्वाधिक खपाची कॉम्पॅक्ट SUV कोणती? Maruti Brezza चा नंबर कितवा....

देशातील सर्वाधिक खपाची कॉम्पॅक्ट SUV कोणती? Maruti Brezza चा नंबर कितवा....

googlenewsNext

तसे तर कोरोनामुळे ऑटो इंडिस्ट्रीचे जवळपास ५-६ महिने फुकटच गेले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजार बंद, कंपन्या बंद. त्यातच जे ग्राहक आहेत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात, यामुळे याचा थेट परिणाम ऑटो सेक्टरवर दिसून आला. या साऱ्या संकटात बीएस ४ ते बीएस ६ मध्ये जाणे. यामुळे अनेक कंपन्यांना नवीन गाड्याही लाँच कराव्या लागल्या आहेत. यातच भारतात सध्या कॉम्पॅक्ट SUV चांगल्याच वेग पकडू लागल्या आहेत. 


यामुळे जर तुम्हाला कॉम्पॅक्ट एसयुव्ही घ्यायचे वाटत असेल तर हा डेटा खूप महत्वाचा आहे. सध्या देशातील देशातील सर्वाधिक खपाची कॉम्पॅक्ट SUV कोणती? असा प्रश्न पडला असेल...अफकोर्स मारुतीची Maruti Suzuki Vitara Brezza नाही का? उत्तर आहे नाही.... नोव्हेंबरमधील देशातील ९ कॉम्पॅक्ट एसयुव्हींच्या खपाची आकडेवारी पाहता मारुतीची ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. कधीकाळी पहिल्या क्रमांकावर असलेली ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर...मग पहिल्या दोन क्रमांकावर कोण, हा देखील प्रश्न पडला असेल...चला पाहुया आकडेवारी.


नोव्हेंबर २०२० मध्ये ४४३९७ ग्राहकांनी कॉम्पॅक्ट एसयुव्ही घेतली आहे. हा आकडा २०१९ च्या तुलनेत खूप जास्त आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये ३१५८५ कॉम्पॅक्ट एसयुव्ही विकल्या गेल्या होत्या. यंदाचा हा आकडा जवळपास १३००० नी वाढला आहे. यामध्ये लॉकडाऊन व नंतरच्या काही महिन्यात कार न घेता आलेल्या लोकांचाही समावेश असेलच परंतू नंबर खूप महत्वाचा आहे. 


नंबर 1: Kia Sonet
नोव्हेंबरमध्ये 11,417 कार विकल्या गेल्या आहेत. किया पहिल्या नंबरवर आहे. 2019 मध्ये ही कार लाँच झालेली नव्हती. 


नंबर 2: Hyundai Venue
नोव्हेंबर 2020 मध्ये 9,265 कार विकल्या गेल्या आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये 9,665 कार विकल्या गेल्या. 


नंबर 3: Maruti Suzuki Vitara Brezza
नोव्हेंबर 2020 मध्ये 7,838 कार विकल्या गेल्या. नोव्हेंबर 2019 मध्ये 12,033 विक्री. 


नंबर 4: Tata Nexon
नोव्हेंबर 2020 मध्ये 6,021 कारची विक्री. नोव्हेंबर 2019 मध्ये 3,437 विक्री. 


नंबर 5: Mahindra XUV 300
नोव्हेंबर 2020 मध्ये 4,458 कारची विक्री. नोव्हेंबर 2019 मध्ये 2,224 विक्री. 
 

Web Title: Which is the most selling compact SUV? Kia Sonet, Maruti Brezza, Hyundai Venue, tata Nexon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.