Vredestein Tyres: भारतीय बाजारपेठेत नवीन टायर ब्रँड लाँच; या देशी कंपनीने युरोपातून आणला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 03:25 PM2021-10-24T15:25:38+5:302021-10-24T15:25:54+5:30

Vredestein Tyres in India: व्रडेस्‍टाइनचे टायर (Vredestein Tyres) 15 ते 20 इंचांच्या श्रेणीमध्ये मिळतील. दुचाकींसाठी देखील टायर लाँच करण्यात आले आहेत.

Vredestein Tyres launched in India by Apollo Tyres | Vredestein Tyres: भारतीय बाजारपेठेत नवीन टायर ब्रँड लाँच; या देशी कंपनीने युरोपातून आणला

Vredestein Tyres: भारतीय बाजारपेठेत नवीन टायर ब्रँड लाँच; या देशी कंपनीने युरोपातून आणला

Next

अपोलो टायर्स (Apollo Tyres) लिमिटेडने भारतामध्‍ये प्रिमिअम युरोपियन ब्रॅण्‍ड व्रडेस्‍टाइन लाँच केला आहे. हा टायर भारतातील अत्‍याधुनिक केंद्रांमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात येणार आहे. या कंपनीचे टायर हे पॅसेंजर कार्समधील प्रिमिअम व लक्‍झरी कारमध्ये वापरता येणार आहेत. सुपर बाईकना दुचाकीचे टायर वापरता येणार आहेत. 

व्रडेस्‍टाइनचे टायर (Vredestein Tyres) 15 ते 20 इंचांच्या श्रेणीमध्ये मिळतील. व्रडेस्‍टाइन अल्‍ट्राक वोर्टी हा टायर मर्सिडीज, बीएमडब्‍ल्‍यू, ऑडी, लँड रोव्‍हर व व्होल्‍वो सारख्या आलिशान गाड्यांमध्ये तर व्रडेस्‍टाइन अल्‍ट्राक हा होंडा सिटी, मारूती सुझुकी सियाझ व बलेनो या सारख्या प्रमिअम हॅचबॅक आणि सेदानला वापरता येणार आहेत. 

दुचाकीसाठी सेण्‍टोरो एनएस व एसटी असे दोन प्रकारचे टायर लाँच करण्यात आले आहेत. हे टायर सामान्य दुचाकींना नाही तर बीएमडब्‍ल्‍यू, ड्युकाती, अॅप्रिलिया, थ्रम्‍प, कावासाकी, सुझुकी, होंडा आणि यामहाच्या सुपर बाईकना वापरता येणार आहेत. व्रडेस्‍टाइन हा 100 वर्षांहून जुना युरोपियन ब्रँड आहे. अपोलोच्या नेटवर्कचा वापर करण्यात येणार आहे. 2009 मध्ये ही कंपनी अपोलोने विकत घेतली होती. 

Web Title: Vredestein Tyres launched in India by Apollo Tyres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.