Used Cars Purchase: सेकंड हँड कार खरेदीचा प्लॅन असेल तर..., या 5 आहेत सर्वात बेस्ट एसयुव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 02:40 PM2021-11-28T14:40:02+5:302021-11-28T14:41:20+5:30

Second Hand Car Purchase: भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठ भल्याभल्यांना पेलवता आलेली नाही. ज्यांना आली त्या कंपन्या आजही राज्य करत आहेत. काही कंपन्यांच्या एकमेव कारच एवढ्या खपतात की त्या सेकंड हँड बाजारात देखील झटकन उचलल्या जातात.

Used Cars Purchase: If you have a plan to buy a second hand car, these are the 5 best SUVs. | Used Cars Purchase: सेकंड हँड कार खरेदीचा प्लॅन असेल तर..., या 5 आहेत सर्वात बेस्ट एसयुव्ही

Used Cars Purchase: सेकंड हँड कार खरेदीचा प्लॅन असेल तर..., या 5 आहेत सर्वात बेस्ट एसयुव्ही

googlenewsNext

भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठ भल्याभल्यांना पेलवता आलेली नाही. ज्यांना आली त्या कंपन्या आजही राज्य करत आहेत. कमी किंमतीत, परवडणारी, चांगले मायलेज देणारी कार भारतीय ग्राहकांना फार आवडीची. यामुळे नवीन नाही घेता आली किंवा कमी बजेटमध्ये सेकंड हँड कार देखील मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. सेकंड हँड एसयुव्ही कार देखील खूप पसंत केल्या जातात. अशा पाच कार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

महिंद्रा स्कॉर्पिओ
ही भारतातील सर्वात लोकप्रिय SUV आहे. सेकंड हँड मार्केटमध्ये या कारला मोठी मागणी आहे. जर वापरलेल्या कारच्या बाजारातून हे वाहन विकत घेत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी 3.5 लाख ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान चांगला असेल.

महिंद्रा XUV 500
या कारचे अपडेटेड व्हर्जन कंपनीने काही काळापूर्वी लॉन्च केले आहे. उत्कृष्ट लूक आणि दमदार कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेली ही कार तुम्हाला युज्ड कार मार्केटमध्ये 4.5 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान मिळेल.

फोर्ड एंडेव्हर
पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे 7 सीटर उत्कृष्ट आहे. आता फोर्डने भारतात कार बनवणे बंद केले आहे, त्यामुळे जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त सेकंड हँड कारच घ्यावी लागेल. ही कार 2 लाख ते 6 लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते.

टोयोटा फॉर्च्युनर
या आलिशान 7 सीटर एसयूव्हीला परिचयाची गरज नाही. ही कार तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्ये 10 लाख ते 15 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या कारची विक्री आता भारतात थांबली आहे. नवीन अपडेटेड मॉडेल येणार आहे. 

महिंद्रा अल्टुरास G4
ही 7 सीटर कार भारतीय बाजारपेठेत खूपच कमी मागणी असलेली आहे. पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ती कोणत्याही फुल साइज एसयूव्हीशी टक्कर देऊ शकते. जर तुम्हाला ही कार सेकंड हँड बाजारात योग्य किमतीत मिळाली तर तुम्ही डोळे झाकून ती खरेदी करू शकता.
 

Web Title: Used Cars Purchase: If you have a plan to buy a second hand car, these are the 5 best SUVs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार