येतेय TVS ची पॉवरफुल Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससोबत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:36 PM2021-07-19T15:36:05+5:302021-07-19T15:41:00+5:30

Electric Scooter : देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या यामध्ये उतरताना दिसत आहेत. 

TVS Creon electric scooter new features rival to Ather 450X to launch soon in india | येतेय TVS ची पॉवरफुल Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससोबत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

येतेय TVS ची पॉवरफुल Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससोबत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ वाढत आहे.अनेक कंपन्या यामध्ये उतरताना दिसत आहेत. 

देशातील इलेक्ट्रीक मोबिलिटी क्षेत्रात सातत्यानं नव्या प्लेअर्सची एन्ट्री होताना दिसत आहे. देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी TVS Motors लवकरच देशांतर्गत बाजारात  आपली इलेक्ट्रीक स्कूटर Creon लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आपल्या इलेक्ट्रीव व्हेईकल पोर्टफोलिओला अधिक सक्षम करण्यासाठी 1 हजार कोटीरूपयांच्या गुंतवणूकीची योजना आखली आहे. 

Creon कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीनं 2018 मध्ये ऑटो एक्सपो दरम्यान पहिल्यांदा प्रदर्शित केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही स्कूटर पुढील वर्षापर्यंत बाजारात दाखल होऊ शकते. येणारी इलेक्ट्रिक स्कूटर ही प्रिमिअम Creon कॉन्सेप्टवर आधारित असेल असंही कंपनीनं म्हटलं होतं. यामध्ये नवं तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हीटीही देण्यात आली आहे. 

TVS च्या या कॉन्सेप्ट स्कूटरबाबत सांगायचं झालं तर यामध्ये अत्याधुनिक लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्यात आला आहे, जी 12kW क्षमतेची पॉवर जनरेट करतात. याशिवाय ही बॅटरी फास्ट चार्जिंगही सपोर्ट करते. तसंच कमी चार्जिंगमध्ये अधिक रेंजची मिळते. ही स्कूटर केवळ 5.1 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 80 किलोमीटरची रेंज देते, तसंच 1 तासात या स्कूटरची 80 टक्क्यांपर्यंत चार्जही होते. 

Web Title: TVS Creon electric scooter new features rival to Ather 450X to launch soon in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.